AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : मोठी बातमी! सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, बारामतीतून लढणार नाही, कारण काय? विरोधकही काय म्हणाले?

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतून निवडणूक न लढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पवार कुटुंबात राजकीय संघर्ष टाळण्यासाठी आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे दुसऱ्या मतदारसंघातून लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून स्वागत होत असून, अनेक नेत्यांनी कुटुंब एकसंध ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे.

Supriya Sule : मोठी बातमी! सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, बारामतीतून लढणार नाही, कारण काय? विरोधकही काय म्हणाले?
सुप्रिया सुळे
| Updated on: May 01, 2026 | 12:19 PM
Share

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या विरोधात नकोच, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांचं नेमकं विधान काय?

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या. मी यापुढे पवार कुटुंबीयांच्या विरोधात कधीही निवडणूक लढणार नाही. मागच्यावेळीही माझी बारामतीतून लढण्याची इच्छा नव्हती. पण त्यावेळी कारणं वेगळी होती. आता मात्र, मी कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात लढणार नाही. मी दुसरा मतदारसंघ बघणार आहे. कुटुंबातील दुसऱ्या कुणाला बारामतीतून लढायचं असेल तर त्यांनी लढावं, मी मात्र, लढणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तसेच पवार कुटुंबीय कालही एक होतं. आजही एक आहे. त्यामुळे 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी कोणतीही लढत होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

कुटुंब दुभंगू नये

दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनीही घेतलेली सकारात्मक भूमिका आहे. कुठल्याही कुटुंबामध्ये वाद असू नये, अशी माझी भूमिका आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशी सर्व राष्ट्रवादी पवार कुटुंबीयांची आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रियाताई सुळे करत आहेत. सुप्रिया सुळे या संवेदनशील आहेत. कुठेही कुटुंब राजकारणामुळे दुभंगू नये, अशी माझी वैयक्तिक भावना आहे, असं उदय सामंत म्हणाले.

हीच आपली संस्कृती

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावर भाष्य केलं आहे. आपली हिंदू आणि भारतीय संस्कृती आहे. एकमेकांचा विचार करण्याची संत महंतांनी आपल्याला शिकवण दिली आहे. एकमेकांच्या भावनांचा विचार करण्याची आपली संस्कृती आहे. आपल्या स्वार्थाच्या पुढे कुटुंबाचे हित पाहणे हीच आपली संस्कृती आहे, असं सांगत त्यामुळे येथून पवार कुटुंबाच्या विरोधात बारामतीमधून निवडणूक न लढण्याचा सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का