AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीनट बटर की शेंगदाणे…आरोग्यासाठी चांगलं काय? जाणून घ्या दोघांमधील फरक आणि फायदे!

Health – तूप, लोणी बटर खाल्ल्यामुळे वजन वाढतं म्हणून अनेक जण ते खाणं सोडतं. आता बाजारात पीनट बटर आलं आहे. हे बटर खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होणार. तर शेंगदाणे खाणेदेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पीनट बटर की शेंगदाणे...आरोग्यासाठी चांगलं काय? जाणून घ्या दोघांमधील फरक आणि फायदे!
पीनट बटर
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 12:11 PM
Share

पीनट बटर हे जीमला जाणाऱ्यांनी नाही तर सगळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पीनट बटर हे खनिजे आणि जीवनसत्त्वाने भरलेलं आहे. त्यामुळे पीनट बटर वाढत्या मुलांसाठी खूप फायद्याचं आहे.

100 ग्रॅम पीनट बटरमधून आपल्याला काय काय मिळतं?

1. व्हिटॅमिन ई 2. व्हिटॅमिन बी 3 3. व्हिटॅमिन बी 6 4. फोलेट 5. तांबे 6. मँगनीज 7. मॅग्नेशियम

पीनट बटर म्हणजे काय?

पीनट बटर हे शेंगदाण्यापासून बनवलं जातं. हे अनप्रोसेस्ड फूड असून हे आपल्याला घरी देखील बनवता येतं.

पीनट बटर बनविण्याची विधी?

शेंगदाणे मिक्सरला बटरसारखं होईल तोपर्यंत त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर त्यात तुम्ही आवश्यक असेल तर थोडी साखर घालू शकता. अन्यथा ही पेस्ट म्हणजे पीनट बटर. तसंच ही पेस्ट करत असताना त्यात थोड ऑलिव्ह आईल घालू शकता. ती पेस्ट अजून छान होण्यासाठी नाही तर याची सुद्धा आवश्यकता नाही. कारण शेंगदाण्याची पेस्ट करताना त्यालाच तेल सुटतं. पीनट बटरचे फायदे 1. वाढत्या मुलांसाठी फायदेशीर – पीनट बटर हे मुला आणि मुलांसाठी फार उपयुक्त आहे. तसंच मुलींसाठी खासकरुन फायद्याचं आहे. स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी मुलींना पीनट बटर द्यायला पाहिजे. 2. डोळ्यांचा आरोग्यासाठी फायदेशीर – पीनट बटरमधील जीवनसत्त्व ए असल्याने ते डोळ्यासाठी खूप फायद्याचं आहे. 3. पीनट बटरचं सेवन केल्यामुळे बॅड कोलोस्ट्रॉल कमी होतं. 4. पचनक्रियेसाठीही पीनट बटर हे खूप उपयुक्त आहे. नियमित पीनट बटर खाल्ल्याने त्यात असलेलं फायबरचं प्रमाण तुम्हाला पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. 5. डेअरी बटरपेक्षा पीनट बटर कधीही चांगलं. कारण पीनट बटर बॅड कोलोस्ट्रॉलला नियंत्रण करत असल्यामुळे मधुमेह, कर्करोग, रक्तदाब आणि हृदयाच्या रोगांपासून आपलं रक्षण होतं. महत्त्वाचं पीनट बटर हे आरोग्यासाठी उत्तम असलं तरी आपल्या शरीराला कुठली गोष्ट किती प्रमाणात हवी याबद्दल कायम डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येक पदार्थ तुमच्या शरीरासाठी चांगलाच असतो असं नाही. काहींना शेंगदाणे किंवा पीनट बटरची एलर्जी देखील असू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही करु नका.

आता आपण जाणून घेऊयात की शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला कसा फायदा होतो. शेंगदाणे हे प्रोटीन, फॅट आणि अनेक पोषकतत्त्वांनी परीपूर्ण असा खाद्यपदार्थ आहे. तर शेंगदाण्यातून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतं. आणि हा प्रत्येक घरात स्वयंपाकात वापरला जातो. भूक लागल्यावर जुनी लोकं आजही शेंगदाणा गूळ खाण्याचा सल्ला देतात.

मूठभर शेंगदाण्यातून काय मिळतं?

1. 426 कॅलरीज 2. 5 ग्रॅम कार्बोहायड्रेट 3. 17 ग्रॅम प्रोटीन शेंगदाणे खाल्ल्याचे फायदे 1. शेंगदाण्याचं नियमित सेवन केल्यामुळे तुम्हाला गॅस आणि अँसिडिटीपासून आराम मिळतो. 2. पचनशक्ती सुधारते आणि भूक लागते. 3. गर्भवती महिला आणि बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 4. ओमेगा-6 फॅटसुद्धा शेंगदाण्यात असल्याने हे त्वचेसाठी खूप चांगल आहे. 5. शेंगदाणे रोज खाल्ल्याने रक्ताची कमतरता भासत नाही. 6. हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी असतो. 7. शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. 8. हाडे मजबूत होतात. 9. महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.

इतर बातम्या

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे?; आणखी तीन बडे नेतेही चर्चेत

गरज भासल्यास परळीतून धनंजय मुंडेंविरुद्ध निवडणूक लढणार, करुणा शर्मा यांचा पवित्रा, शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा!

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.