जिंकलेला छिंदम पुन्हा हरणार? कोर्टात याचिका

जिंकलेला छिंदम पुन्हा हरणार? कोर्टात याचिका

अहमदनगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आला. या निवडीला आव्हान देणारी याचिका आता अहमदनगर जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील अपक्ष उमेदवार निलेश म्हसे यांनी छिंदमविरोधात याचिका दाखल केली आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी हरकत घेण्यात आली होती. मात्र […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:50 PM

अहमदनगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आला. या निवडीला आव्हान देणारी याचिका आता अहमदनगर जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील अपक्ष उमेदवार निलेश म्हसे यांनी छिंदमविरोधात याचिका दाखल केली आहे.

उमेदवारी अर्जाच्या छाननीच्या वेळी हरकत घेण्यात आली होती. मात्र निवडणूक प्रक्रिया जवळ आल्याने निवडणूक झाल्यानंतर आपले म्हणणे मांडण्यास हायकोर्टाने परवानगी दिली होती. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेविरुद्ध निलेश म्हसे यांनी याचिका दाखल केली आहे.

नगर मनपात छिंदम विजयी!

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यामुळे सध्या तडीपारीची कारवाई भोगत असलेला श्रीपाद छिंदम प्रभाग क्रमांक नऊमधून तब्बल 1970 मतांनी निवडून आलाय. छिंदमला एकूण 4532 मतं मिळाली. तर त्याच्या विरोधातील भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना 2562 मतं मिळाली. आपला विजय निश्चित असल्याचा दावा श्रीपाद छिंदमने मतदान केल्यानंतर केला होता.

कुणाला संपवायचं ते मतदारांच्या हातात असतं, मतदार हा राजा असून माझा विजय निश्चित आहे, असं श्रीपाद छिंदमने काल म्हटलं होतं. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली असली तरी त्याला मतदानाची परवानगी देण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

विजयानंतर श्रीपाद छिंदम शिवरायांसमोर नतमस्तक

छिंदम कसा जिंकला? महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें