Budget 2020 : वाहनचालकांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेल एक रुपयाने महाग

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. इंधनावर अतिरिक्त कर आकारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. Petrol Diesel Price hike Maharashtra Budget

Budget 2020 : वाहनचालकांच्या खिशाला कात्री, पेट्रोल-डिझेल एक रुपयाने महाग

मुंबई : ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वच क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बजेटच्या अखेरीस वाहनचालकांचा खिशाला कात्री लावणारी घोषणा करण्यात आली. पेट्रोल-डिझेलच्या दरात एका रुपयाची वाढ करण्याचं अजित पवारांनी जाहीर केलं. (Petrol Diesel Price hike Maharashtra Budget)

वाहन इंधनाच्या दरात प्रतिलीटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. इंधनावर उपकर आकारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पुढील दोन वर्षांसाठी हा उपकर आकारला जाईल. ही रक्कम पर्यावरणीय समस्यांसाठी काम करणाऱ्या ग्रीन फंडाकडे पाठवली जाईल. पेट्रोल-डिझेल एक रुपयाने महाग झाल्यामुळे वाहनचालक काहीसे खट्टू झाले आहेत.

अजित पवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडला.

बजेटमध्ये महत्त्वाचं काय?

मुद्रांक शुल्क

-पुढील दोन वर्षांत मुंबई पुण्यात मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट देण्याची घोषणा, बांधकाम व्यवसायाला दिलासा देण्याचा प्रयत्न

-सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून 50 कोटींची तरतूद

सामाजिक न्याय

 • सामाजिक न्याय विभागासाठी 9 हजार 668 कोटी,
 • पुण्यात मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह,
 • आदिवासी विकास विभागाला 8 हजार 853 कोटी,
 • ऊसतोड कामगारांच्या मुलांना वसतिगृहे,
 • तृतीयपंथीयांच्या स्वतंत्र मंडळासाठी 5 कोटी
 • GST
  • मुंबईत वस्तू आणि सेवा केंद्र उभारणार, वस्तू आणि सेवा केंद्रासाठी 148 कोटी रुपये

  आमदार विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटींवर, पाच वर्षात विकास निधी 15 कोटींवर नेणार, अजित पवारांच्या घोषणेचं आमदारांकडून बाक वाजवून जोरदार स्वागत

 • दिवंगत नेत्यांची स्मारकं 

  दिवंगत नेत्यांच्या स्मारकाची घोषणा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण, गोपीनाथ मुंडे, आर आर पाटील यांची स्मृतिस्थळं बांधणार

 • शिवभोजन 
  • दररोज एक लाख शिवभोजन थाळ्या,
  • शिवभोजन थाळीसाठी 150 कोटींची तरतूद : अजित पवार

राज्यातील सध्याची आर्थिक परिस्थिती, जागतिक मंदीचं सावट, कर्जमाफी योजना, गृहनिर्माण धोरण, कृषी सिंचन योजना, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात अंमलबजावणी, कोरोना व्हायरससारख्या आजारांच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजना यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद असावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती.

Petrol Diesel Price hike Maharashtra Budget

अर्थसंकल्पाशी निगडीत महत्त्वाचे मुद्दे वाचा : Maharashtra Budget 2020 Live Updates : महाराष्ट्र अर्थसंकल्प लाईव्ह

Published On - 12:27 pm, Fri, 6 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI