AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara News : लेकीच्या हाकेला धावले अन् अघटित घडलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; खामगावात काय घडलं ?

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या आरती शिंदेला विजेचा धक्का बसल्यानंतर तिला वाचवण्यासाठी धावलेले आई, वडील आणि भाऊही विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले. महावितरणच्या तुटलेल्या केबल वायरमुळे ही हृदयद्रावक घटना घडली. कष्टाळू शिंदे कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Satara News : लेकीच्या हाकेला धावले अन् अघटित घडलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; खामगावात काय घडलं ?
खामगावात घडली दुर्दैवी घटना
| Edited By: | Updated on: Jul 09, 2026 | 12:21 PM
Share

सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणारी आणि काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे घडली. घरासमोरील विजेच्या खांबावर असणारी केबल वायरच्या सपोर्ट तारेत करंट उतरला आणि या तारेचा धक्का शिंदे कुटुंबातील मुलीला लागला. तिची किंकाळी ऐकून वाचवण्यासाठी, तिचे आई-वडील, भावाने बाहेर धाव घेतली, मात्र त्यांनाही शॉक लागल्याने, एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या मुलीसोबतच आई, वडील आणि भाऊ देखील विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले आणि पाहता पाहता एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. सतीश शिंदे (वडील), गंगुबाई शिंदे (आई), आरती शिंदे (मुलगी) आणि सचिन शिंदे (मुलगा) अशी जागीच मृत पावलेल्या दुर्दैवी सदस्यांची नावे आहेत. या भीषण दुर्घटनेतून सचिन यांचा मोठा भाऊ सागर आणि त्यांची पत्नी सुदैवाने बालंबाल बचावले. तसेच मयत सचिन शिंदे ची पत्नी आणि साडेतीन वर्षाचा लहान मुलगा देखील बचावला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली असून प्रचड हळहळ व्यक्त होत आहे.

खाकी वर्दी चढवण्याचं स्वप्न क्षणात खाक्

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबीय हे अत्यंत गरीब असून ऊसतोडीचे कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. खामगाव येथील एका खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ ते वास्तव्यास होते. कुटुंबाची गरिबी हटवण्यासाठी आणि अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून, आरती शिंदे ही अहोरात्र पोलीस भरतीचा सराव करत होती. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटेही ती धावण्याचा सराव करण्यासाठी बाहेर गेली होती. पहाटे सहाच्या सुमारास सराव करून ती घरासमोर आली असता, महावितरणच्या खांबावरील केबल वायर च्या सपोर्ट तार तुटून जमिनीवर पडली होती. अंधार आणि अनवधानाने आरतीचा पाय या वायरवर पडला आणि ती विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडली.

लेकीला मृत्यूच्या दारा पाहून आई-वडिलांची धाव

विजेचा तीव्र झटका बसताच आरतीने मदतीसाठी प्रचंड आरडाओरडा केला. आपल्या पोटच्या लेकीला मृत्यूच्या दारात पाहून घरातून वडील सतीश, आई गंगुबाई आणि भाऊ सचिन हे मागेपुढचा कोणताही विचार न करता तिला वाचवण्यासाठी बाहेर धावले. मात्र, पाऊस किंवा हवेतील ओलसरपणामुळे विद्युत प्रवाह जमिनीवर पसरला होता. लेकीला वाचवण्याच्या प्रयत्नात हे तिघेही एकापाठोपाठ एक विजेच्या प्रवाहाच्या संपर्कात आले आणि काही क्षणांतच चौघांचेही जिवंत मृतदेह जमिनीवर पडले.

हा थरार पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला.शिंदे कुटुंब हे कष्टाळू कुटुंब म्हणून गावात ओळखले जात होते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असून, आता घरात केवळ सागर शिंदे त्यांची पत्नी, आणि मयत सचिनची पत्नी साडेतीन वर्षांचा लहान मुलगा जिवंत राहिले आहेत.

नातेवाईकांची मागणी काय ?

या उघड्यावर पडलेल्या कुटुंबाला शासनाने आणि महावितरणने तातडीने मोठी आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त हाक नातेवाईक आणि ग्रामस्थांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत खांबावरील उर्वरित वायर्स हटवल्या आहेत. शासनाने या कुटुंबाच्या बाबत गांभीर्याने दखल घेऊन उरलेल्या सदस्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांमधून होत आहे

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी