AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी नकली खासदार, ते कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत…, हैदराबादमधून अमित शाहांचा हल्लाबोल

भाजपच्या वतीने सुरू असलेल्या ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता मिटाओ’ अभियानादरम्यान हैदराबादमध्ये एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी नकली खासदार, ते कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत..., हैदराबादमधून अमित शाहांचा हल्लाबोल
Amit Shah Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 6:17 PM
Share

भाजपच्या वतीने सुरू असलेल्या ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता मिटाओ’ अभियानादरम्यान हैदराबादमध्ये एका सभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलंगणा राज्यातून आम्ही काँग्रेस पक्षाला मुळासकट उखडून टाकू असा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. राहुल गांधी हे एक नकली खासदार आहेत, ते कधीच एक असली खासदार आणि पंतप्रधान होऊ शकत नाही, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाकडे देखील लक्ष वेधलं, जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाला झुकवलं नसतं, तर आज हैदराबाद हा भारताचा भाग बनलाच नसता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाला गुडघे टेकवण्यास भाग पाडलं. त्यामुळेच हैदराबाद संस्थान भारताचा भाग होऊ शकला असं यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज हैदराबादच्या रस्त्यांवर शेकडो नागरिक उतरले आहेत, रविवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत देखील एक रॅली झाली होती, राहुल गांधी यांनी असा दावा केला होता की ही काँग्रेसची ‘वोट बचाओ’ रॅली आहे. परंतु ती ‘वोट बचाओ’ रॅली नव्हती तर घुसखोरांना वाचवा रॅली होती, असा हल्लाबोल देखील यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे.

काँग्रेसकडून एनपीआर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा विरोध सुरू आहे. काँग्रेस एनपीआरला विरोध करून बांगलादेशी घुसखोरांना वाचवत आहे, आणि याच लोकांचं मतदान यादीमध्ये नाव कायम ठेवण्याचा काँग्रेसचा डाव आहे. मात्र मी हे स्पष्ट सांगतो की तुम्ही कितीही प्रयत्न करा, जोपर्यंत या घुसखोरांचं नाव मतदान यादीमधून वगळलं जात नाही, तोपर्यंत भाजप शांत बसणार नाही, असंही यावेळी अमित शाह यांनी म्हटलं आहे.  तसेच त्यांनी विविध मुद्द्यांवरून देखील काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला घुसखोर वाचवायचे आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

Follow Us
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात