फलटण डॉक्टर महिला प्रकरणात पहिला धक्कादायक CCTV समोर; हादरवून टाकणारी माहिती!

फलटण येथील महिला डॉक्टरने चेकइन केलेल्या हॉटेल रुममध्ये आत्महत्या केली. त्यानंतर हॉटेल मालकावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. या सगळ्यावर हॉटेल मालकाने मोठे पाऊल उचलले. त्याने नेमकं काय केलं जाणून घ्या...

फलटण डॉक्टर महिला प्रकरणात पहिला धक्कादायक CCTV समोर; हादरवून टाकणारी माहिती!
Satara Doctor case
Image Credit source: Tv9 Network
Updated on: Oct 29, 2025 | 2:21 PM

साताऱ्यामधील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. महिला डॉक्टरने हॉटेल रुममध्ये आत्महत्या केली की तिची हत्या झाली असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांपासून ते अनेक नेत्यांनी उपस्थित केला. त्यावर आता हॉटेल मालकाने मोठे पाऊल उचलले आहे. होणाऱ्या आरोपांवर त्याने चोख उत्तर दिले आहे.

प्रकरण काय?

मूळची बीडची असणारी महिला डॉक्टर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती. ती फलटणमध्येच प्रशांत बनकर यांच्या घरातील वरच्या मजल्यावर राहत होती. एक दिवस अचानक तिच्या घराला कुलूप लावण्यात आले. तसेच घरमालक प्रशांत आणि डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर महिला डॉक्टरने मधूदीप हॉटेल दोन दिवसांसाठी बूक केले. तिने प्रशांक बनकर आणि पीएसआय गोपाल बदने यांच्याशी संवाद साधला. पण कोणीही मदत न केल्यामुळे शेवटी महिला डॉक्टरने हॉटेल रुममध्येच आत्महत्या केली. दोन दिवस खोलीचा दरवाजा न उघडल्यामुळे तोडण्यात आला. तेव्हा महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले. तसेच तिने हातावर एक नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये तिने प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले.

वाचा: फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील PSI निघाला चालाख! शरण येण्यापूर्वी केले मोठे काम, नेमकं काय केलं?

हॉटेल मालकाने नेमकं काय केलं?

सध्या प्रशांत बनकर आणि गोपाल बदने हे पोलीस कोठडीत आहेत. दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत महिला डॉक्टरने आत्महत्या केलेले हॉटेल कोणाचे आहे? खरच महिला डॉक्टरने आत्महत्या केली का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर आता मधूदीप हॉटेलचा मालक रणजितसिंह भोसले यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी थेट महिला डॉक्टरचा हॉटेलमध्ये चेकइन करतानाचा CCTV फूटेज शेअर केला आहे.

प्रकरण वेगळ्या वळणावर

महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बीडमध्ये तीन व्यक्ती चढले टॉवरवर. बीड शहरातील भाजी मंडीतील टॉवरवर तिघेजण चढून बसल्याने गोंधळ झाला आहे. तिघांनी माजी खासदार रणजीत निंबाळकर यांना आरोपी करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा आणि आत्महत्या प्रकरणाची एस आय टीच्या माध्यमातून चौकशी करावी या तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.