डॉक्टर महिला प्रकरण एका शब्दाने फिरणार? पुरावे बाहेर काढत सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी एका शब्दाचा उल्लेख केला आहे.

डॉक्टर महिला प्रकरण एका शब्दाने फिरणार? पुरावे बाहेर काढत सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट!
Sushma Andhare
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 29, 2025 | 4:37 PM

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे फलटण येथील डॉक्टर महिला प्रकरणात आता एक वेगळे वळण आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी महिला डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईट नोटमधील अक्षर तिचे नसल्याचा दावा केला आहे. तसेच महिला डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईट नोटमधील एक शब्द आणि यापूर्वी लिहिलेल्या एका चार पानी पत्रातील तोच शब्द वेगळ्या पद्धतीने लिहिला गेला आहे. त्यामुळे महिला डॉक्टरची आत्महत्या आहे की हत्या झाली असा सवाल उपस्थित केला आहे.

9 वेळा लिहिलेला शब्द सुसाइट नोटमध्ये चुकला?

सुषमा अंधारे यांनी महिला डॉक्टर प्रकरणातील काही पुरावे सर्वांसमोर मांडले आहेत. त्यांनी महिला डॉक्टर संपदा हांडे यांनी हातावर लिहिलेला मेसेजमध्ये पोलीस निरीक्षक हा शब्द आणि महिला डॉक्टरने चार पानी लिहिलेलं लेटर यात वेगळा आहे. या चारपानी पत्रात महिला डॉक्टरने निरीक्षक हा शब्द जवळपास नऊ वेळा लिहिलेला आहे. त्यामुळे सुसाईट नोटमध्ये लिहिताना महिला डॉक्टरने तो शब्द चुकीचा कसा लिहिला? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.

वाचा: फलटण महिला डॉक्टर प्रकरणातील PSI निघाला चालाख! शरण येण्यापूर्वी केले मोठे काम, नेमकं काय केलं?

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

हा निरीक्षक शब्द.. तिच्या चार पानी पत्रातील निरीक्षक हा शब्द आहे त्यातील र ची जी वेलांटी आहे ती दीर्घ आहे. ती हा शब्द नऊ वेळा लिहिला आहे.एकदा लिहिलेला नाही. हे काम पोलिसांचे आहे. मी सोपं करुन देतेय. नऊ वेळा तिने लिहिलेला हा शब्द हा आणि त्याची वेलांटी दुसरी आहे. अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द लिहिला आहे त्याची वेलांटी पहिली आहे. हे धक्कादायक आहे असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

मृत्यूनंतर व्हॉट्सअॅप स्टेटस लाईक कसे केले जाऊ शकते

मी नुकतेच डॉक्टर महिलेच्या  बहिणीला तसेच तिच्या भावाशी संपर्क केला. माझा डॉक्टर महिलेच्या भावाशी संपर्क होऊ शकला नाही. तुम्ही वेळेबद्दल काहीतरी प्रश्न उपस्थित करत होत्या, असं मी त्यांना विचारलं. याबाबत बोलताना मला समजलं की सातारा डॉक्टरचे प्रकरण समोर आले त्या दिवशी डॉक्टर तरुणीच्या बहिणीने तिला कॉल केला होता, असे म्हणत अंधारे यांनी पुढे गंभीर प्रश्न उपस्थित केले.