AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हाधिकाऱ्याने थेट शिवसेनेच्या महिला नेत्याला झापलं; ही राजकारण करण्याची…

राज्यात पावसाने कहर केला असून अनेक भागात मोठे नुकसान झाले. फक्त नुकसानच नाही तर अतिवृष्टी देखील झालीये. मुख्यमंत्र्यांनी लोकांना मदत पोहोचवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला नेत्याला जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.

जिल्हाधिकाऱ्याने थेट शिवसेनेच्या महिला नेत्याला झापलं; ही राजकारण करण्याची...
Solapur District Collector and SJyoti Waghmare
| Updated on: Sep 29, 2025 | 12:24 PM
Share

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सध्या पंचनामे सुरू आहेत. प्रशासनाकडून पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आली. हेच नाही तर लोकांची राहण्याची आणि खाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केलीये. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सतर्क राहण्यासोबतच लोकांना मदत तात्काळ पोहोचवा अशा सूचना दिल्या. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत रस्त्यावर उतरले. सोलापुरमध्ये शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले झापले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांनी थेट म्हटले की, तुमच्या पक्षाकडूनही मदत करा ना…3 हजार लोक असताना तुम्ही फक्त 200 किट घेऊन आले. नुसते 200 किट नको तर 3 हजार लोकांची व्यवस्था करा. हेच नाही तर आम्ही लोकांना बाहेर काढले, तुम्ही नाही, असेही त्यांनी यादरम्यान ज्योती वाघमारे यांनी म्हटले. राजकारणाची वेळ नाही मदत वाढवा. तुमची मदत वाढवा, असे जिल्हाधिकारी ज्योती वाघमारे यांना ठणकावून म्हणताना दिसले.

जेवणाच्या किटवरून ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता. यावेळी त्या जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनीच त्यांना चांगल झापलं. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि ज्योती वाघमारे यांच्यातील संवादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्योती वाघमारे या मदत घेऊन पोहोचल्या होत्या.

लोकांना जेवणाच्या किट मिळाल्या नसल्याने त्या चागंल्याच संतापल्या आणि त्यांनी थेट फोन स्पीकरवर ठेऊन लोकांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी फोन लावलेल्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनीच चांगले झापले आणि आम्ही लोकांना मदत पुरवत आहोत. पुन्हा पूर येण्याची स्थिती असल्याने प्रशासन काम करत आहे. 3 हजार लोक तिथे असताना तुम्ही फक्त 200 किट घेऊन आल्याचे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलेच सुनावले आणि ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले.

शेतकऱ्यांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोचवणे हा माझा गुन्हा आहे का?? मी काय दोन नंबर धंद्यासाठी, टेंडरच्या टक्केवारीसाठी फोन केला होता का?? लोकांचा आवाज बनणे हा जर गुन्हा असेल तर कुणी फासावर लटकवले तरी मी चालेल मी लढत राहीन, असे शिवसेना नेत्या ज्योती वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या संवादानंतर स्पष्टपणे म्हटले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...