प्रत्येक घरातून 10 रुपये, पिंपळदरीच्या गावकऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले तब्बल…

प्रत्येक घरातून 10 रुपये, पिंपळदरीच्या गावकऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले तब्बल...

फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जग सध्या कोरोनाविरोधात लढत (Pipaldari villege donate CM relief fund) आहे. यात जेवढं करु तेवढं कमी पडणार आहे.

Namrata Patil

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Apr 08, 2020 | 10:22 PM

परभणी : फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जग सध्या कोरोनाविरोधात लढत (Pipaldari villege donate CM relief fund) आहे. यात जेवढं करु तेवढं कमी पडणार आहे. मग सरकार असो की सामान्य माणूस. जर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला भारताकडे हायड्रोक्लोरोक्विनसाठी हात पसरावे लागले आहेत. तर उद्या भारतालाही काही शेजाऱ्यांकडून मागावं लागू शकतं. एकमेकांची हिच गरज ओळखून मदत करणं गरजेचं आहे.

महाराष्ट्र सरकारलाही आपल्याला मदतीची गरज आहे. सरकारकडे साधनं कमी (Pipaldari villege donate CM relief fund) आहेत. पैशांचाही तुटवडा भासत आहे. त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरीच्या गावकऱ्यांनी फूल नाही फुलाची पाकळी म्हणून सरकारच्या तिजोरीत काही रक्कम दान करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार त्यांनी गावातील प्रत्येक घरातून 10 रुपये गोळा करण्याचा निर्णय घेतला. तसेच ज्यांना जास्त रक्कम द्यायचे असतील तेही इच्छिक स्वरुपात देऊ शकतात. यात कुणालाही पैशासाठी सक्ती नव्हती.

पैसे गोळा करायला लागल्यावर कुणालाही पैशासाठी सक्ती करण्यात आली नाही. काही चिमुकल्यांनी त्यांच्या वाढदिवसासाठी जमा केलेले पैसेही दिले. दरम्यान बघता बघता पिंपळदरीकरांनी 21 हजार 500 रूपये जमा केले.

यानंतर ही रक्कम उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील, गंगाखेड तहसिलदार कंकाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सुराडकर, पोलीस निरिक्षक शेख साहेब यांनी गंगाखेड इथं पिंपळदरीच्या सरंपच आणि नागरिकांच्या वतीनं सुपूर्द करण्यात आली.

श्री संत मोतीराम महाराजांच्या चरणी हे संकट दूर करण्याची प्रार्थनाही गावकऱ्यांनी केली. देशावरचं, महाराष्ट्रावरचं, पिंपळदरी आणि परिसरातील सगळ्यांवरचं संकट दूर होवो अशी प्रार्थना ग्रामपंचायत पिंपळदरी आणि समस्त गावकऱ्यांनी (Pipaldari villege donate CM relief fund) केली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें