लघु कर्जांनी बदललं लाखो पथविक्रेत्यांचं जीवन, स्वप्नांना मिळाले नवे पंख ; PM स्वनिधीची 6 वर्षांची कामगिरी

Good news: पीएम स्वनिधी योजनेने पथविक्रेत्यांना तारणविरहित कर्ज देऊन आत्मनिर्भर होण्याची संधी दिली. आजपर्यंत, या योजनेअंतर्गत 75.5 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना एकूण 17,800 कोटींहून अधिक कर्ज वितरित करण्यात आलंय.

लघु कर्जांनी बदललं लाखो पथविक्रेत्यांचं जीवन, स्वप्नांना मिळाले नवे पंख ;  PM स्वनिधीची 6 वर्षांची कामगिरी
पीएम स्वनिधी योजना
| Updated on: Jun 01, 2026 | 2:43 PM

एखाद्या मंदिराबाहेर पुजेचं सामाना विकणार महिला असो की रस्त्याच्या कडेला टपरीवरचा चहा विक्रेता, किंवा गल्ला-गल्ल्यांत फिरून भाजी विकणारा फेरीवाला किंवा फुटपाथवरचा चांभार. बऱ्याच काळापासून, या छोट्या व्यवसायांसमोरील सर्वात मोठे आव्हान होतं – ते म्हणजे भांडवलाचा अभाव ! कोविड-19 नंतर तर हे संकट एवढं वाढलं की ते (लोकं) कंगालच झाले. मात्र याच काळात सुरू करण्यात आलेल्या ‘प्रधानमंत्री स्वनिधी’ योजनेने लाखो कुटुंबांसाठी आत्मसन्मान आणि स्वावलंबनाचा एक नवीन अध्याय सुरू केला.

जून 2020 साली सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 75.5 लाखांहून अधिक पथविक्रेत्यांना 1.12 कोटींहून अधिक कर्ज दिलंय. 17,800 कोटींपेक्षा अधिक कर्ज वितरण झालंय. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही गॅरेंटीशिवाय 15 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल कर्ज दिलं जातंस त्यामुळे छोट्या विक्रेत्यांना काम, त्यांचा व्यवसाय वाढवता येतो.

PM स्वनिधिची 6 वर्षांची कामगिरी

– 75.5 लाखांहून अधिक पथविक्रेत्यांना लाभ झाला

– 17,800 कोटी रुपयांहून अधिक मदत

– 34.81 लाख महिला विक्रेत्यांचे सक्षमीकरण झाले

– 55 लाखांहून अधिक विक्रेते डिजिटल पेमेंटशी जोडले गेले

गाझियाबादची बबीता ते गांधी नगरच्या योगराजपर्यंत

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, या योजनेचा प्रभाव केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नाही. गाझियाबादची बबिता शर्मा हे याचं जितजागतं उदाहरण आहे. एका मंदिराच्या जवळ पूजेचे साहित्य विकणारं, छोटसं दुकान चालवणाऱ्या बबिताकडे आधी मर्यादित मालसाठा असायचा. मात्र स्वनिधीकडून कर्ज घेऊन तिने आपला स्टॉक वाढवला, नवीन उत्पादने आणली आणि नंतर एक गाडीदेखील विकत घेतली. आजची तिची विक्री आणि उत्पन्न हे दोन्ही पूर्वीपेक्षा चांगले आहेत.

तिरुअनंतपुरम येथेही मिळाली मदत

तिरुअनंतपुरम येथे राहणारी शांती आर. ही महिला आधी जास्त व्याजदराच्या कर्जांवर अवलंबून होती. मात्र स्वनिधीकडून मिळालेल्या कर्जामुळे तिला दिलासा मिळाला. त्यांनी रस्त्यावर सुके मासे विकायला सुरुवात केली, ते पॅक करून स्थानिक दुकानांना पुरवले. आता त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणाता वाढला आहे आणि त्यांना स्वनिधी क्रेडिट कार्डचाही लाभ मिळाला.

गुवाहाटीच्या सेवाली कलिताची कहाणी ऐकली का ?

गुवाहाटीच्या सेवाली कलिता यांची कहाणीसुद्धा प्रेरणादायी आहे. पानाचं छोटं दुकान चालवणाऱ्या सेवाली यांनी सुरवातीला 10 हजार रुपयांचे कर्ज घेतलं आणि ऑर्गॅनिक भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू, त्यांनी आणखी कर्ज घेऊन भाजीपाल्याचे एक वेगळे दुकान उघडलं. आज त्या, त्यांच्या पतीसह एक यशस्वी व्यवसाय चालवता, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीदेखील पूर्णपणे बदलली आहे. तर गांधीनगरमध्ये राहणारे चणा विक्रेते, योगराज माळी यांचा व्यवसाय कोविडच्या काळात जवळजवळ बुडाला होता. पण पीएम स्वनिधी कर्जामुळे त्यांना सावरण्याची संधी मिळाली. त्यांनी डिजिटल पेमेंटचा अवलंब केला आणि कॅशबॅकचा लाभ घेतला.

विकासाच्या प्रवासात भागीदार बनले पथविक्रेते: खट्टर

या संदर्भात, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पीएम स्वनिधी योजनेच्या कामगिरीबद्दल माहिती दिली. पीएम स्वनिधीचं सर्वात मोठं यश म्हणजे, या योजनेने छोट्या व्यवसायांना दान न देता, वाढीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असं ते म्हणाले. एकेकाळी उपेक्षित मानले जाणारे पथविक्रेते आता देशाच्या विकास प्रवासात सक्रिय सहभागी होत आहेत. या कारणामुळेच आता ही योजना मार्च 2030 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 मध्ये कोविड महामारीच्या कठीण काळात पथविक्रेत्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. लाभार्थ्यांचे सरासरी उत्पन्न दरवर्षी 20 टक्क्यांनी वाढले आहे, असं खट्टर यांनी नमूद केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us