कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून कवी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारला

कार्यक्रमस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून कवी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारला

कार्यक्रस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून कवी यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे.

Akshay Adhav

|

Jan 15, 2021 | 10:22 PM

नागपूर :  ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र कार्यक्रस्थळी सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून त्यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार नाकारला आहे. आपण नम्रपणे पुरस्कार नाकारत आहोत, असा निरोप त्यांनी आयोजकांना कळवला आहे. (Poet Yashwant Manohar turned down the award for keeping the image of Saraswati)

साहित्य संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण पुरस्कार स्वीकारु, असे संमतीपत्र त्यांनी दिले होते. मात्र अचानक आपण पुरस्कार नाकारत आहोत, असं त्यांनी आयोजकांना कळविल्याने साहित्य क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

कवी यशवंत मनोहर यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण अगोदरच एक महिना देण्यात आलं होतं. मात्र मी माझी मूल्ये सोडून पुरस्कार घेऊ शकत नाही. मी नम्रपणे पुरस्कार नाकारतो आहे, असं त्यांनी म्हटलं.

…म्हणून यशवंत मनोहर यांनी पुरस्कार नाकारला

विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार आपण का नाकारला, या प्रश्नाचं उत्तर माध्यमांना देताना यशवंत मनोहर म्हणाले, “माझी इहवादी भूमिका, तसंच माझी लेखक म्हणून असलेली भूमिका याची साहित्य संघाला कल्पना असेल असं मला वाटलं होतं तथा तसा माझा समज होता. परंतु कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काय काय असेल? असं मी जेव्हा आयोजकांना विचारलं त्यावेळी त्यांनी सरस्वतीची प्रतिमा मंचावर असेल, असं त्यांनी मला सांगितलं. त्याक्षणी मी त्यांना माझी मूल्य नाकारुन हा पुरस्कार मी स्वीकारु शकत नाही, असं सांगितलं. तसंच मी हा पुरस्कार नम्रपणे नाकारत असल्याचं आयोजकांना कळवलं.

 सरस्वतीऐवजी सावित्रीबाई फुले का नाही?

अशा प्रकारच्या पुरस्कार समारंभामध्ये सरस्वतीऐवजी सावित्रीबाई फुले किंवा भारतीय राज्यघटनेची प्रतिमा का ठेऊ शकत नाही? किंबहुना वाड:मयीन कार्यक्रमात कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे यांच्या प्रतिमा का लावल्या जात नाही? असे सवाल यावेळी कवी यशवंत मनोहर यांनी विचारले.

आमची परंपरा आम्ही बदलणार नाही, साहित्य संघाची भूमिका

त्यांनी जरी सरस्वतीच्या प्रतिमेला विरोध केला असला तरी आम्ही आमची परंपरा बदलणार नाही. त्यांनी जशी त्यांची मूल्ये जपली तशीच आम्ही आमची मूल्ये जपू, अशी भूमिका विदर्भ साहित्य संघाने घेतली आहे.

सरस्वतीला आम्ही सारस्वतांचे प्रतिक मानतो. देव-देवतांचा याठिकाणी काहीच प्रश्न येत नाही. आम्ही केवळ सरस्वतीच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आम्ही आमच्या परंपरेनुसार कार्यक्रम पार पाडला, अशी भूमिका विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी मांडली.

हे ही वाचा

निजामाच्या अत्याचाराचं काँग्रेस समर्थन करत आहेत का?; सावंतांच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा सवाल

पुण्यात 8 लसीकरण केंद्र, प्रत्येक केंद्रावर 100 नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस, वाचा पुण्यातील लसीकरणाची वैशिष्ट्ये

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें