पुण्यात बापट ‘इफेक्ट’, DJ अन् लाऊडस्पीकरने कानठळ्या बसल्या; पोलिसांकडून 100 हून अधिक मंडळावर गुन्हा
पुण्यात यंदा विद्यानंद बापट 'इफेक्ट' दिसून आला. विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर आता ध्वनी प्रदुषण करणाऱ्या गणेश मंडळावर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यातील सर्व मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन संपन्न झालं. पुण्यातील या गणेश विसर्जन सोहळ्याला 34 तास लागले. तब्बल 34 तासानंतर डीजेचा आवाज कमी झाला. त्यानंतर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही मोठ्या प्रमाणात डीजे वाजवण्यात आले होते. पोलिसांनी एकूण 91 मंडळावर कारवाई केली आहे. पोलिसांनी आवाहन केल्यानंतरही नियमांचं पालन न केल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. नाशिक आणि पुण्यातील 100 हून अधिक मंडळावर कारवाई करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये डीजेचा दणदणाट,पोलिसांकडून कारवाई
पिंपरी-चिंचडवध्ये गणेश आगमन ते विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही मंडळांनी नियम धाब्यावर बसवले होते. डीजे आणि लेजरचा वापर करणाऱ्या 91 गणेश मंडळांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. पोलिसांनी 86 मंडळांचे डीजे साहित्य जप्त करण्यात आले आहे. परिमंडळ दोनमध्ये सर्वाधिक 44 गुन्हे, तर परिमंडळ एकमध्ये 15, परिमंडळ तीनमध्ये 8 आणि परिमंडळ चारमध्ये 10 गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांच्या वारंवार आवाहनानंतरही ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. डीजेचा दणदणाट आणि लेझरचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
नाशिकमध्ये 11 मंडळावर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये अकरा सार्वजनिक गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत अटी शर्ती धाब्यावर बसवून डीजेचा दणदणाट करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डिसिबलची मर्यादा ओलांडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस, ध्वनी प्रदूषण विभाग मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त तपासणीत निष्पन्न झालं. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मंडळांनी जमा केलेले एक लाख रुपयांची अनामत रक्कमही सरकार जमा होणार आहे.
पुण्यात 34 तासांनंतर मिरवणुकीची सांगता
पुण्यात अनेक मंडळाच्या गणेशाचं ढोल ताशांच्या गजरात विसर्जन झालं. यंदाही पुण्यातील वंशाली गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन तसेच आवाजावर कठोर नियंत्रण ठेवण्याची आश्वासन प्रत्यक्षात फारसे परिणामकारक ठरले नाहीत. मंडळामधील वाढलेले अंतर डिजेचा दणदणाट आणि प्रशासनाची ढिलाई यामुळे यंदाची मिरवणूक सुमारे 33 तास 33 मिनिटे रेंगाळली. परंतु यंदा मागीलवर्षीपेक्षा एक तास नऊ मिनिटांनी मिरवणूक लवकर संपली.
