Picnic: सगळ्या पिकनीकचा बट्ट्याबोळ! सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या पर्यटकांना पोलिसांनी अडवले; पर्यटनस्थळावर पोहचून काहीच एन्जॉय न करता परत फिरावं लागल
गळ्यांच्या पिकनिकचा बट्ट्याबोळ झाला आहे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या पर्यटकांना पोलिसांनी अडवले पर्यटन स्थळावर पोहोचू दिले नाही. पुढे जाण्यास परवानगी नसल्याने काही एन्जॉय न करता पर्यटकांना घरी परत फिरावे लागले. माथेरान, पुणे, इगतपुरी अशा अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

मुंबई : मस्त पावसाळी वातावरण हिरवे गार डोंगर आणि डोंगरावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे हा सर्व नजारा पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. यामुळे आपसूकच पर्यटकांची पावले धबधबे आणि इतर पर्यटन स्थळांकडे( tourist spot) वळू लागली आहेत. शनिवार, रविवार असा सुट्टीचा बेत करत पर्यटकांनी पिकनिकचे प्लान्स बनवले. मात्र सगळ्यांच्या पिकनिकचा बट्ट्याबोळ झाला आहे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडलेल्या पर्यटकांना पोलिसांनी अडवले पर्यटन स्थळावर पोहोचू दिले नाही. पुढे जाण्यास परवानगी नसल्याने काही एन्जॉय न करता पर्यटकांना घरी परत फिरावे लागले. माथेरान, पुणे, इगतपुरी अशा अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन स्थळी पोहोचलेल्या पर्यटकांना पोलिसांनी पुढे जाऊच दिले नाही. परिणामी स्पॉटवर पोहचून पर्यटकांना परत फिरावे लागले. यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी
पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही आज रविवारच्या दिवशी अनेक पर्यटक सिंहगडावर (Sinhagad) जाण्यासाठी निघाले होते. मात्र रस्त्यातूनच त्यांना माघारी लावण्यात आले. आज रात्री 12पर्यंत ही बंदी असणार आहे. उद्यापासून पर्यटन स्थळे खुली होण्याची शक्यता आहे. मात्र आज रविवारीचा मुहूर्त साधत गेलेल्या पर्यटकांच्या (Tourist) पदरी मात्र निराशा पडली आहे. कारण पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे हजारो पर्यटक गडाच्या दिशेने निघाले होते. मात्र सिंहगडाच्या पायथ्याशी गोळेवाडी येथे वन विभागाच्या तपासणी नाक्यावरून पर्यटकांना निराश होऊन परतावे लागले. गड बंद असल्याचे पर्यटकांना सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या (Forest department) मात्र नाकी नऊ येत होते. अनेक पर्यटक लांबून आले होते. दुसरीकडे गड बंद असल्याची माहिती दर्शविणारा फलक लावलेला नसल्याने कर्मचाऱ्यांचीही सांगता सांगता दमछाक होत होती.
जुन्नर तालुक्यातील नानेघाट जीवधन किल्ला परिसरात विकेंड मुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी
हवामान खात्याने पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील किल्ले आणि धरण परिसरात 14 जुलै ते 17 जुलै पर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू केली होती. मात्र पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नानेघाट जीवधन किल्ला परिसरात विकेंड मुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र, या ठिकाणी पर्यटकांना रोखले जात असल्याने पर्यटकांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
इगतपुरी तालुक्यात पर्यटकांना बंदी, पर्यटनस्थळी मोठा बंदोबस्त तैनात
विकेंडच्या सुट्टय्या असल्याने इगतपुरी तालुक्यात पर्यटनस्थळे आणि गडकिल्ल्यांवर शेकडोच्या संख्येत पर्यटक आले. मात्र, जोरदार पाऊस पडत असल्यामुळे आणि जिवीत हानी होऊ नये यासाठी वन विभागाने केलेल्या पर्यटनस्थळ बंदीमुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना परत माघारी परतावे लागले. यामुळे पर्यटकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. पिंपरी फाटा, भावली धरण, कुरुंगवाडी, नगर परिषद फॉल, जामुंडा फॉल इत्यादी ठिकाणी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला असून इगतपुरी पोलीस आणि वन विभाग कडून कोणत्याही पर्यटकांना पर्यटन स्थळी जाण्यास मज्जाव केला जात आहे.
माथेरान घाटात ट्रॅफिक जॅम,पोलिसांची बघ्याची भूमिका 144 कलमाची ऐशी की तैशी
वीकेंड असल्याने पर्यटकांचा लोंढा आपसूक माथेरान कडे वळला. हजारो पर्यटक माथेरान घाटातील धबधब्याकडे वळले असल्याने घाटात गाड्या पार्क केल्याने माथेरान कडे जाणारी वाहने आणि माथेरान हून खाली नेरळ कडे येणाऱ्या वाहनांचा प्रचंड प्रमाणात खोळंबा झाला.मात्र इथे पोलिस तैनात असूनही आणि कलम 144 लागू असून पोलिस इथल्या गर्दीला काबू करण्यात सपशेल अपयशी ठरल्याने घाटातील वाहनांची संख्या अधिक वाढल्याने घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या मनस्ताप सहन करावा लागला.
वसई-विरार मधील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी; पोलिसांचा मनाई आदेश लागू
अँकर:-वसई-विरार मधील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.पर्यटन स्थळांवरती जाण्यास पोलिसांनी मनाई आदेश लागू केला आहे.मात्र पोलिसांच्या मनाई आदेशाचे तीन तेरा वाजवत आज रविवार असल्याने समुद्र किनाऱ्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत. वसई-विरारच्या अर्नाळा, राजवडी, कळंब, नवापूर, पाचुबंदर या समुद्र किनाऱ्यावर तर पर्यटकांची मंदी आळी पाहायला मिळत आहे.सुरक्षेतेच्या दृष्टीकोनातून किनाऱ्यावर कुठेही पोलीस बंदोबस्त अथवा तटरक्षक जवान दिसत नाही. त्यामुळे आपत्कालीन घटना घडण्याची देखील शक्यता आहे.
