महिला डॉक्टर दोघांचाही संपर्कात, मृत्यूच्या रात्रीही… पोलिस तपासात धक्कादायक खुलासे, थेट..

Satara Doctor Case : साताऱ्याच्या फलटण शहरातील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडालीये. पोलिसांकडून या प्रकरणावर भाष्य केले जातंय. चक्क एक पीएसआय या प्रकरणात आरोपी आहे.

महिला डॉक्टर दोघांचाही संपर्कात, मृत्यूच्या रात्रीही... पोलिस तपासात धक्कादायक खुलासे, थेट..
Satara Doctor Case Police
| Updated on: Oct 28, 2025 | 12:42 PM

सातारा फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली. संपदा मुंडे मागील काही वर्षांपासून फलटणच्या शासकीय रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. विशेष म्हणजे कामात अत्यंत मेहनती असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने विविध चर्चा रंगताना दिसत आहे. आत्महत्येपूर्वी संपदा मुंडे यांच्या मनात खूप काही सुरू होते. फलटण शहरात किरायाने घर असताना देखील त्यांनी हॉटेल दोन दिवसांसाठी बुक केले आणि तिथेच आत्महत्या केली. आत्महत्येच्या पूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर एक नोट लिहित चक्क फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचा आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहून गंभीर आरोप केली.

पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला असून ही आत्महत्या नव्हे तर हत्या असल्याचा आरोप काहींनी केला. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा गुंता वाढला असल्याचे नुकताच पोलीस अधीक्षकांनी म्हटले. संपदा मुंडे यांनी रात्री दीड वाजता आत्महत्या केल्याचे शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले. मात्र, आत्महत्या करण्याच्या अगोदर संपदा मुंडे या दोन्ही आरोपींच्या संपर्कात होत्या.

पीडितेचे दोन्ही आरोपींसोबत असलेले संबंध, संवाद आणि मोबाईल चॅटिंगमुळे गुंता अधिक वाढला. हेच नाही तर पीडितेने हॉटेल बुक केल्याने अधिक गुंता वाढलाय. पोलिसांकडून सध्या प्रत्येक अॅंगलने तपास केला जात आहे. तपासात ही देखील माहिती मिळाली आहे की, पीडिता संपदा मुंडे या आत्महत्येच्या काही तास अगोदर दोन्ही आरोपींच्या संपर्कात होत्या. त्या चॅटिंग करत होत्या.

संपदा मुंडे यांचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असून आता त्यासंदर्भातील तपास केला जात आहे. इतर आरोपींची मोबाईल पोलिस ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या तिघांमध्ये नेमके काय सुरू होते, त्या रात्री हे फक्त आणि फक्त मोबाईलमधील चॅटिंग आणि इतर गोष्टींमुळे स्पष्ट होऊ शकते. दोन्ही आरोपींनी मान्य केले आहे की, ते महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संपर्कात होते.