
रोहित आर्या नावाच्या व्यक्तीने मुंबईतील पवई भागातील आरए स्टुडिओमध्ये तब्बल 17 मुलांना ओलीस ठेवले. त्याच्या काही मागण्यांसाठी त्याने हा प्रकार केला. शिक्षण विभागामध्ये त्याचे काही पैसे अडकल्याचे त्याने सांगितले. सतत तो फोनवर बोलत होता. पवई पोलिस त्याच्यासोबत संवाद साधत होते. मात्र, त्याने आपले म्हणणे स्पष्ट मांडले नसल्याचेही सांगितले जातंय. आता एक अंगावर काटा आणणारी माहिती पुढे आली असून मोठी खळबळ उडालीये. रोहित आर्या याने एक खतरनाक असा प्लॅन आखला होता. जर थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्याने मुलांना आपण किडनॅपिंग सीन शूटिंग करणार आहोत असे सांगितले होते. मुलांना बंदूक, ज्वलनशील पदार्थ दाखवत यात तुम्हाला एक्टिंग करायची आहे असे सांगितले होते. काही मुलांच्या तोंडावर पट्ट्याही मारल्या होत्या, जेणेकरून हा सिन खरा वाटावा. मात्र, त्यानंतर आर्याने खऱ्या किडनॅपिंग सुरुवात केली. मुलांना सुरूवातीला याची अजिबातच काही कल्पना नव्हती.
26 तारखेला आलेल्या मुलांची संख्या जवळपास 36 होती, त्यापैकी दुसऱ्या दिवशी सिलेक्ट झालेली 23 मुल हजर होती. कालच्या ऑडिशनला १७ मुले शिल्लक राहिलेली होती. रोहितने स्टुडिओच्या आतमध्ये एकूण पाच नवीन कॅमेरे स्वतः बसवले होते. तर सोसायटीच्या काही कॅमेऱ्यांचा एक्सेस रोहितने मिळवला होता, ज्याधारे तो पोलीस आणि इतर लोकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. सर्व रूममध्ये रोहितने ज्वलनशील पदार्थ पसरवून ठेवले होते.
रोहितने स्टुडिओच्या सर्व भागात ह्युमन सेन्सोरची यंत्रणा ऐक्टिव्हेट केली होती, जेणेकरून त्याला प्रत्येक हालचालीचा अलर्ट येत होता. एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टप्रमाणेच रोहितने हे सगळं प्लॅनिंग केल होत असा पोलिसांचे म्हणणं आहे. पोलिसांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि अत्यंत हुशारीने बाथरूमच्या खिडकीतून स्टुडिओमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी सर्व मुलांना व्यवस्थित बाहेर काढले. यादरम्यान पोलिसांनी मारलेला गोळीमध्ये रोहित आर्या याचा मृत्यू झाला.