AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातच्या बायकोला पोलिसांचा मोठा दणका, आता सर्व मार्ग बंद, थेट…

अशोक खरात याचे एक -एक कारनामे समोर येत आहेत, सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे, तर त्याची बायको कल्पाना खरात ही फरार आहे. तिचा पोलिसांकडून शोध सुरू असून, मोठी बातमी समोर आली आहे.

अशोक खरातच्या बायकोला पोलिसांचा मोठा दणका, आता सर्व मार्ग बंद, थेट...
KALPANA KHARATImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 02, 2026 | 4:22 PM
Share

अशोक खरात याच्याविरोधात अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला न्यायालयानं आठ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान एसआयटीच्या चौकशीमध्ये त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. तर दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार असून,  शिर्डी पोलिसांकडून फरार असलेल्या कल्पना खरात हिचा शोध सुरू आहे.  शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरात हिचा शोध सुरू आहे, मात्र ती अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे.

शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह त्याच्या पत्नीवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात ही फरार आहे. शिर्डी पोलिसांकडून सध्या कल्पना खरात हिचा शोध घेतला जात आहे. दरम्यान ती परदेशात पळून जाऊ शकते अशी शक्यता असल्यानं, पोलिसांनी आता तिच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता कल्पना खरात हिचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.

अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा 

दरम्यान अशोक खरात याचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने अनेक जणांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन मोठा कारनामा केला आहे. तो काही पतसंस्थेत उघडण्यात आलेल्या शेकडो बँक खात्याचा नॉमिनी असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर ही सगळी खाती तो स्वत:च हाताळत होता, त्याने आतापर्यंत या बँक खात्याच्या माध्यमातून शंभर कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार केले आहेत, अशी माहिती देखील समोर येत आहे. या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आता अशोक खरात याच्या पत्नीच्या विरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केल्यानं तिचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू