AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर सुरू होता भलताच उद्योग, बंगल्यातील दृश्य पाहून पोलीसही हादरले

जळगावमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे, या प्रकरणात माजी महापौरासह एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, चौकशी सुरू आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर सुरू होता भलताच उद्योग, बंगल्यातील दृश्य पाहून पोलीसही हादरले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2025 | 7:24 PM
Share

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. जळगावमध्ये सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे, त्यामध्ये माजी महापौरांचा देखील समावेश आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाईन गंडा घालण्यात येत होता. आतापर्यंत या कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या कॉल सेंटवर छापा टाकाला.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी लोकांना संपर्क साधून, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची ऑनलाइन फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जळगावातील मुराबाद रोडवर असलेल्या माजी महापौरच्या फॉर्म हाऊसमध्ये हे बनावट कॉल सेंटर सुरू होतं. या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे.  या प्रकरणात  पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले असून, अटकेची कारवाई सुरू आहे.

शिवसेना शिंदे गटात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीचा हा फॉर्म हाऊस आहे. तिथेच हे कॉल सेंटर सुरू होतं. तेच हे कॉल सेंटर चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या बनावट  कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना आतापर्यंत लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील तरुण या ठिकाणी काम करत होते. या तरुणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऑनलाईन कंपन्यांचे नाव सांगून लोकांची फसवणूक सुरू असल्याचं समोर आलं आहे.  20 दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक विदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी