Poultry Farmers: कोरोनानंतर आता पुन्हा पोल्ट्री व्यावसायिक संकटात; अतिउष्णतेमुळे कोंबड्या मृत, कोंबड्यांना वाचवण्यासाठी खर्च वाढला

सांगलीः मिरज तालुक्यातील (Miraj Sangli) आरग, बेडग परिसरात वाढत्या उन्हाच्या अती तीव्रतेमुळे पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) अडचणीत सापडला आहे. अतिउष्णतेचा परिणाम शेतीसह पोल्ट्री व्यवसावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अती उष्णतेमुळे पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचा (poultry birds) बचाव करण्यासाठी व्यावसायिकांना विविध उपाय योजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायीकांचा खर्च […]

Poultry Farmers: कोरोनानंतर आता पुन्हा पोल्ट्री व्यावसायिक संकटात; अतिउष्णतेमुळे कोंबड्या मृत, कोंबड्यांना वाचवण्यासाठी खर्च वाढला
Image Credit source: TV9
महादेव कांबळे

|

Apr 23, 2022 | 8:44 PM

सांगलीः मिरज तालुक्यातील (Miraj Sangli) आरग, बेडग परिसरात वाढत्या उन्हाच्या अती तीव्रतेमुळे पोल्ट्री व्यवसाय (Poultry Business) अडचणीत सापडला आहे. अतिउष्णतेचा परिणाम शेतीसह पोल्ट्री व्यवसावर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अती उष्णतेमुळे पोल्ट्री फॉर्ममधील कोंबड्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचा (poultry birds) बचाव करण्यासाठी व्यावसायिकांना विविध उपाय योजना कराव्या लागत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायीकांचा खर्च वाढलेला आहे. वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्याच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यामुळे त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक ताण (Economically Problem) सहन करावा लागत आहे.
वातावरणात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम शेतीवरही जाणवू लागला आहे. वारंवार पिकांना पाणी देऊनही पिके सुकू लागली आहेत. तर काही पिके वाळून गेली आहेत. पोल्ट्रीमधील पक्षांना अतिउष्णतेने त्रास होत असल्याने असल्याने शेतकरी पोल्ट्रीमध्ये फॅन बसवणे, पाणी फवारणी, तर पक्षांना ओला थंडावा मिळावा म्हणून बारदान पोती, उसाचा पालापाचोळा ओला करून पत्रा शेडवर टाकली जात आहेत.
पोल्ट्री फॉर्म व्यावसायिकाना हा जादाचा खर्च लागत असल्याने शेतकऱ्यांसह व्यावसायिकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.  पोल्ट्रीतील पक्षी वाढत्या उन्हामुळे आणि उष्णतेचा त्रास होत असल्याने मृत्यूंचे प्रमाणही  वाढले आहे. कोंबड्या मरु नये यासाठी हा अधिकचा खर्च पोल्ट्री व्यावसायिकांना करावा लागत असल्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

इतर खर्च वाढला

अति उष्णतेने पक्षाचे वजन घटत आहे, दिवसा प्रचंड ऊन आणि सायंकाळी पावऊस पडत असल्याने या संमिश्र वातावरणाचाही परिणाम या पक्षावंर होत आहे. सकाळी 8 पासून ते दुपारी 4 पर्यंत फार उन्हाचा मारा आणि सायंकाळी पाऊस यामुळे प्राणी, पक्षी व शेतातील पिकांची हानी होत आहे. वाढणारी उष्णता प्रचंड असल्याने कोंबडीच्या लहान पिल्लांना पोल्ट्रीतील कोंबडी पिल्ले फार नाजूक असतात त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळे दिवसभर पोल्ट्रीमध्ये फॅन लावणे, सतत शेडवर पाणी फवारणी करावी लागत आहे.

कोंबड्यांचे वजन कमी

आरग बेडग परिसरात पोल्ट्री व्यवसाय मोठ्या संख्येने आहेत. अतिउष्णतेमुळे पक्षांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे त्यातच पक्षांची खाद्य महागले आहे. समस्या निर्माण होत असल्याने कोंबड्यावर वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढला आहे. या समस्या निर्माण होत असल्यामुळे परिणामी कोंबड्यांचे वजन कमी भरत आहे. त्याचा आर्थित फटका आम्हाला बसत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक मोहसीन मकानदार यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

Lawyer Rizwan Merchant, Navneet Rana : आधी संजय दत्तसाठी लढले, आता नवनीत राणांच्या पाठी खंबीर उभे; कोण आहेत रिजवान मर्चंट?

VIDEO : उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

Fadnavis on Rana Arrest : नवनीत राणासह पतीलाही मुंबई पोलिसांकडून अटक, घटना व्यथित करणारी, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें