AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shakti Act: पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, आमदार नमिता मुंदडा यांची सूचना!

महिला अत्याचाराविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती कायदा  (Shakti Act)मंजूर झाला. मात्र त्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. तसेच पीडितेला तक्रार नोंदवताना दिली जाणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, अशी सूचना नमिता मुंदडा यांनी आज विधानसभेत केली.

Shakti Act: पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, आमदार नमिता मुंदडा यांची सूचना!
भाजप आमदार, नमिता मुंदडा
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 24, 2021 | 3:25 PM
Share

मुंबईः महिला अत्याचाराविरोधात कठोर शिक्षेची तरतूद असलेला शक्ती कायदा  (Shakti Act)मंजूर झाला. मात्र त्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. तसेच पीडितेला तक्रार नोंदवताना दिली जाणारी वागणूक आधी बदलली पाहिजे, अशी लक्षवेधी सूचना नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी आज विधानसभेत केली. शक्ती कायद्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी एका संयुक्त समितीचे गठन करण्यात आले होते. त्यानंतर सुधारणांसह यासंबंधीचे विधेयक हिवाळी अधिवेशनात (Winter session) मांडले गेले आणि काल 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याने या कायद्याला मंजुरी दिली.

काय म्हणाल्या नमिता मुंदडा?

भाजप आमदार नमिता मुंदडा म्हणाल्या, ‘ शक्ती कायदा आल्यानंतर त्याची काटेकोर अंमलबजावणी करण खुप महत्वाचं आहे. फक्त कायदा आणून उपयोग होणार नाही. या शक्ती कायद्याचा फायदा आणि संरक्षण होणं गरजेचं आहे. जेव्हा कधी अशी घटना घडते तेव्हा सबंधित महिलाला मिळणारी वागणूक ही चुकीची असते. तिला पोलिस स्टेशनमध्ये मिळणारी वागणूक ही बदलली पाहिजे. अशा वेळी संबंधित पिडीत महिलेला आधार देणारी पोलिस प्रशासन आणि यंत्रणा असावी. याबरोबरच सबंधित महिलेच्या घरी जाऊन तिच्या सर्व मेडिकल चाचण्या पार पाडाव्यात. पिडीत महिलेला अपराधी असल्याची वागणून मिळण चुकीचं आहे.

‘अधिवेशनाचा कार्यकाळ ही चिंतेची बाब’

अधिवेशनाच्या कार्यकाळाविषयी नमिता मुंदडा यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अधिवेशनाचा कार्यकाळ ही चिंतेची बाब, दोन वर्षात एवढ्या गोष्टी मागे पडल्या आहेत की एक जास्तीत जास्त कालावधीच अधिवेशन घेण्याची मोठी गरज आहे.

2 वर्षात फक्त 20 दिवस अधिवेशन- श्वेता महाले

तसेच भाजप आमदार श्वेता महाले यांनीदेखील अधिवेशनाच्या कार्यकाळाबद्दल नाराजी व्यक्त केली, त्या म्हणाल्या, आत्तापर्यंतच्या इतिहासात आमादारांची ही एकमेव बॅच आहे, जिला दोन वर्षात फक्त 20 दिवसांच्या अधिवेशनाचा अनुभव आहे. शेतकरी, विद्यार्थी अडचणीत आहेत त्यामुळे जास्तीत जास्त कामकाज चालावं, अशी अपेक्षा होती.

इतर बातम्या-

काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला बेवकूफ बनवू नये, मुस्लिम आरक्षणावरून इम्तियाज जलील भडकले, विधानभवनात नेत्यांच्या काय प्रतिक्रिया?

रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून आधी अडवलं, नंतर सोडलं; फोनाफोनी कामी आली?

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल