AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapuri Chappal : मोठ्या विदेशी फॅशन ब्रँडकडून कोल्हापुरी चप्पलेची नक्कल, संभाजीराजे छत्रपती आक्रमक

Kolhapuri Chappal : "भारतीय संस्कृती व परंपरेशी जोडलेले कोणतेही अस्सल भारतीय उत्पादन जागतिक स्तरावर जात असताना त्याची मूळ ओळख टिकून रहावी व त्या उत्पादनासोबतच भारतीय संस्कृती व परंपरा देखील जागतिक स्तरावर पोहोचावी, हाच यामागचा उद्देश आहे" असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Kolhapuri Chappal :  मोठ्या विदेशी फॅशन ब्रँडकडून कोल्हापुरी चप्पलेची नक्कल, संभाजीराजे छत्रपती आक्रमक
Kolhapuri Chappal
| Updated on: Jun 27, 2025 | 10:52 AM
Share

कोल्हापुरी चप्पलची फक्त महाराष्ट्रात नाही, तर जगभरात ओळख आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला कोल्हापुरी चप्पल वापरणारी माणस भेटतील. आता प्राडा नावाच्या विदेशी फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून ती स्वतःच्या नावाने बाजारात आणली आहे. या विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवला आहे. “प्राडा कंपनीने कोल्हापूरी चप्पलचा उगम, इतिहास, कोल्हापूर भागातील कारागिरांची कौशल्यपूर्ण कला, किंवा भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेखही केलेला नाही. ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी नाही, ही कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची व शेकडो वर्षे हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. “राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला व कारागिरांना राजाश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली. कोल्हापूरी चप्पल हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून, शेकडो वर्षांची कारागिरी, कौशल्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिलं आहे.

“कोल्हापूरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना त्यासोबत त्या चपलेची मूळ ओळख देखील पोहोचावी, शेकडो वर्षे ही कला ज्यांनी जोपासली, टिकवली, वाढवली व विकसित केली त्या कारागीरांना त्याचा योग्य मोबदला मिळावा, त्या कलाकृती मागील संस्कृती, वारसा व परंपरेची देखील जगाला ओळख व्हावी, यासाठी कोल्हापूरी चप्पलला 2019 साली GI मानांकन मिळाले आहे. या GI मानांकनाच्या अधीन राहून त्याचे सर्व नियम पाळत या कंपनीने कोल्हापुरी चपलेची विक्री केली असती तर कोल्हापुरी जगभरात पोहोचली म्हणून आंनदही व्यक्त केला असता, मात्र सरळसरळ डिझाईन कॉपी करून, चपलेची मूळ ओळख लपवून स्वतःच्या नावाने त्याची विक्री करणे हे कृत्य “सांस्कृतिक अपहार” (Cultural Appropriation) चे मोठे उदाहरण आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर देशभरातून यावर पडसाद

“सोशल मीडिया वर देखील देशभरातून यावर पडसाद उमटत आहेत, मात्र PRADA कंपनी कडून अद्याप कोणताही प्रतिसाद पाहायला मिळालेला नाही. कंपनीने आपली चूक वेळीच सुधारून कोल्हापुरीची अस्सल ओळख न लपविता कोल्हापुरी चप्पल बाजारात आणले तर आम्ही स्वागतच करू” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. “शेकडो, हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीची, कलाकृतींची अशी नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना योग्य वळण लावण्यासाठी भारत सरकारनेही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच ग्राहक म्हणून आपणही याविरुद्ध आवाज उठवून अशा कंपन्यांना वेळीच त्यांची चूक सुधारविण्यास भाग पाडले पाहिजे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर