AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खडसेंचं मन रमत नव्हतं’, प्रफुल्ल पटेल यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आता परत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खडसेंचं मन रमत नव्हतं, असा खुलासा केला.

'खडसेंचं मन रमत नव्हतं', प्रफुल्ल पटेल यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
प्रफुल्ल पटेल आणि एकनाथ खडसे
| Updated on: Apr 07, 2024 | 6:54 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे स्वगृही परतणार आहेत. त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी खडसेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ खडसे यांचं मन राष्ट्रवादीत रमत नव्हतं, असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. “आम्हाला माहीत होतं की एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार आहेत. त्यांचं मन रमत नव्हतं. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची जागा दिली. पण त्यांचं मन त्यात रमलं नाही. बरं झालं ते पुन्हा भाजपात जात आहेत. आता आम्ही एकत्र काम करू, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिल्ली.

एकनाथ खडसे यांना राज्यपालाची संधी मिळणार का? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “खडसेंना कोणती संधी मिळते हे मला माहीत नाही. पण महाराष्ट्रमध्ये भाजप रुजवण्यात त्यांच्या फार मोलाचा वाटा आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एकनाथ खडसे यांनी त्या काळात भाजप वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यामुळे त्यांचं मन भाजप आहे”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

‘युतीधर्मानुसार काम करावं लागतं’

यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची जागा का सोडावी? असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले. याबाबत प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न विचारला असता, “शिरसाट काय बोलले हे मला माहीत नाही. पण पक्षश्रेष्ठी बसून प्रत्येक जागेवर विचार करून निर्णय घेतात. लोकसभेनुसार पक्षाच्या इच्छेनुसार कोणत्याही जागा देता येत नाही. युतीचा एक धर्म असतो आणि त्याप्रमाणे ठरल्यानुसार प्रत्येकाला काम करावं लागतं”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

संजय निरुपम यांना प्रफुल्ल पटेल यांचा सल्ला

काँग्रेसमधून निलंबित झालेले नेते संजय निरुपम शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा असताना भाजपचे मोहित कंबोज आणि मनसे दोघांनी याला विरोध केला आहे. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, “संजय निरुपम इतके वर्ष काँग्रेसमध्ये राहिले कसे हेच मला माहीत नाही. ते माझे मित्र आहेत. पण आता लवकरात लवकर त्यांना इतरत्र कुठेतरी योग्य स्थान मिळेल. ते चांगले काम करत आहेत आणि मुंबईमध्ये त्यांचं चांगलं काम आहे. त्यांनी लवकरात लवकर एखादा पक्षात जावं, अशी माझी त्यांना सदिच्छा”, असा सल्ला प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.