ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात; प्रफुल्ल पटेल यांचा टोला

| Updated on: Dec 28, 2020 | 10:45 AM

ईडीची नोटीस येणं स्वस्त झालं असून आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातेय, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे. (praful patel reaction on ed summons eknath khadse and sanjay raut wife)

ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात; प्रफुल्ल पटेल यांचा टोला
Follow us on

नागपूर: भारतात अनेकांना ईडीची नोटीस येत असते. त्यात काही नवीन नाही. ईडीची नोटीस येणं स्वस्त झालं असून आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातेय, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला आहे. (praful patel reaction on ed summons eknath khadse and sanjay raut wife)

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ईडीच्या नोटीसमध्ये काहीच नवीन नाही. भारतात अनेकांना ईडीच्या नोटीस येतात. हे आता स्वस्त झालंय. ईडीची नोटीस येणं याचं कुणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कुणालाही नोटीस बाजवली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. ईडीच्या नोटीसला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कुणी चुकीचं केलं तर बाहेर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल, असंही ते म्हणाले.

 

ईडीचा वापर दुर्देवी: देशमुख

जो भाजपच्या विरोधात बोलेल किंवा त्यांच्या धोरणाविरोधात बोलेल त्याच्या मागे ईडी किंवा सीबीआयची चौकशी लावली जाते. या यंत्रणांचा राजकीय वापर होत असल्यानेच आम्ही सीबीआयबाबत निर्णय घेतला. सीबीआय आमच्या परवानगी शिवाय महाराष्ट्रात येऊ शकत नाही. सीबीआयला राज्यात प्रवेश द्यायचा की नाही हा आमचा अधिकार आहे, असं सांगतानाच ईडीचा असा राजकीय वापर होणं दुर्देवी आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीचं राजकारण कधीच पाहिलं नाही, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने वर्षा यांना 29 डिसेंबर रोडी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (praful patel reaction on ed summons eknath khadse and sanjay raut wife)

संबंधित बातम्या:

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

(praful patel reaction on ed summons eknath khadse and sanjay raut wife)