भाजपा, शिवसेनेला जबर धक्का, शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा, महायुतीला वगळून…

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी वाढल्या आहेत. अनेक नेते राजीनामे देत असून युती आणि आघाड्यांच्या राजकारणाला वेग आला आहे. हे राजकारण तापलेले असतानाच आता राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला आहे.

भाजपा, शिवसेनेला जबर धक्का, शेवटी ज्याची भीती तेच झालं, अजितदादांच्या पक्षाची थेट घोषणा, महायुतीला वगळून...
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Nov 16, 2025 | 4:42 PM

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडी वाढल्या आहे. जिल्हापातळीवरील राजकारणाला तर चांगलाच वेग आला आहे. नेते, आमदार, मंत्री आपापल्या मतदारसंघातली नगरपंचायत, नगरपरिषद जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहेत. प्रसंगी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेत आहेत. असे असताना आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या माहितीनुसार आता महायुतीचे तिन्ही पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमधील महत्त्वाचा मानला जाणार राष्ट्रवादी हा घटकपक्ष भंडारा जिल्ह्यात एकत्र निवडणूक लढवणार आहे. तशी माहितीच प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सर्वच ठिकाणी युती करून निवडणूक लढवली तर आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देणे शक्य होणार नाही, असे म्हणत त्यांनी एकला चलो रे, चे संकेत दिले आहेत. ‘काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युतीचे गणित जुळून आले तर एकत्र लढणे शक्य होईल. आमच्या महायुतीतील तिन्ही घटकपक्षांचे कार्यकर्ते हे उत्सुक आहेत. नऊ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत. स्वाभाविकच आहे की इच्छुकांची खूप गर्दी असते. महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकणार नाही,’ असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

बिहार निवडणुकीतील निकालावर सारवासारव

तसेच एखाद्या ठिकाणी तडजोड करायची असेल तर ती करू. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहोत. एखाद्या ठिकाणी कुठे तडजोड करायचा प्रसंग आल्यास आम्ही तसं करू, असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या विधानसभा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 16 उमेदवार उभे केले होते. मात्र, त्या सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावर बोलताना बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नका असं सांगितले होते, असे विधान केले. यावर बोलताना ‘बिहारच्या स्थानिक लोकांनी ठरवलं, पक्षाचा कुठंही आग्रह नव्हता. आम्ही कुठंही प्रचाराला गेलो नाही. स्थानिक स्तरावर पक्षाचे जे संघटन असते त्या संघटनेतील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा असते. बिहारची निवडणूक लढवण्याचा निर्णय बिहारमध्ये स्थानिक पातळीवर झाला, अशी सारवासारव पटेल यांनी केली.