AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणूक महाराष्ट्रातील शेवटची निवडणूक? पोलिसांचा अहवाल… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

प्रकाश आंबेडकर यांनी नुकताच भाजपासह काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी भाजपाला थेट डाकू म्हटले की, काँग्रेसला भुरटे चोर म्हटले. प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाखतीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

महापालिका निवडणूक महाराष्ट्रातील शेवटची निवडणूक? पोलिसांचा अहवाल... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Prakash Ambedkar
| Updated on: Jan 13, 2026 | 12:28 PM
Share

गणेश सोनोने अकोला : अकोल्यातील जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपासह काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी शेलक्या शब्दांत हल्ला चढवला आहे…. तर काँग्रेस हा पक्ष छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारा भूरटा चोर आहे….तर भाजपवाले हे मात्र डाकू असल्याचं आंबेडकर यांनी म्हटले. भाजपवाले अख्खं दुकानच लुटून नेतात त्यामुळे डाकूंच्या सत्तेला पूर्णविराम देण्याचं आवाहन आंबेडकरांनी केल आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचितच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवणी गावातील प्रचारसभेत बोलत होते. तर पोलीस ही शेवटची निवडणूक असल्याचं म्हणतायेत…. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचं कंबरडं मोडा असं आवाहन त्यांनी मतदारांना केले.

दरम्यान, महाराष्ट्रात सरकारकडूनच गुंडगिरी चालू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अकोल्यात मतदारांचे प्रभाग जाणिवपूर्वक बदलल्याचा आरोप त्यांनी केला आणि एमआयएमची भाजपसोबतची युती मुस्लिमांना रुचली नसल्याचं आंबेडकरांनी यादरम्यान म्हटले. आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, भाजपाचे कंबरडे मोडले तर त्यांचा सत्तेत जाण्याचा मार्ग बंद होईल. मी म्हणतो की, काँग्रेसवाले भूरटे चोर आहेत. कुठं सामान चोर दुकानातले, कुठे पैसे चोर, कुठे पाच रूपयांचे बिकिस्टचे पाकिट असते ते चोर…

हे सर्व भूरटे चोर आहेत. पण हे बीजेपीवाले डाकू आहेत हे लक्षात ठेवा. बीजेपीवाले डाकू आहेत आणि ते अख्खे दुकानच लुटतात. दुकानातला माल शिल्लकच ठेवत नाहीत. त्यामुळे या डाकूंच्या सत्तेला कुठेतरी पूर्णविराम देण्याची गरज आली आहे, हे लक्षात घ्या आणि तो पूर्णविराम तुमच्याशिवाय दुसरे कोणीच देऊ शकत नाही, हे देखील लक्षात घ्या. परिस्थिती अत्यंत बिकड आहे हे लक्षात घ्या.

पोलिस खात्यामधील चर्चा मी आपल्याला सांगतो. पोलिस खातं असं म्हणत आहे की, ही कदाचित शेवटची निवडणूक आहे. तुम्हाला आता ही शेवटची निवडणूक करायची आहे का? हा प्रश्न उपस्थित जनतेला प्रकाश आंबेडकर विचारताना दिसले. यावर लोक नाही म्हटले. आंबेडकर पुढे म्हणाली की, का शेवटी निवडणूक करायची नाही ते सांगा… या प्रचारसभेत भाजपाला प्रकाश आंबेडकरांनी थेट डाकू म्हटल्याने जोरदार चर्चा रंगताा दिसत आहे.

... तर मी माझी दाढी काढून टाकणार! इम्तियाज जलील यांचं मोठं चॅलेंज
... तर मी माझी दाढी काढून टाकणार! इम्तियाज जलील यांचं मोठं चॅलेंज.
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
भाजप-शिंदेंचे लोक एकमेकांची धुलाई करताय; संजय राऊतांचा खळबळजनक दावा.
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका
हिंदी-मराठी वाद निवडणुकीचा मुद्दा नाही; मैथिली ठाकूरची स्पष्ट भूमिका.
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ
पैसे वाटप करण्याआधी यादी व्हायरल! संभाजीनगरचा धक्कादायक व्हिडीओ.
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी
नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी.
नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक
नाशिक सिव्हिल ICU घोटाळा उघड, डॉक्टर निखिल सैंदाणेंना अटक.
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी; राऊतांचा निशाणा.
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले
भाजपच्या माजी मंत्र्यांची जीभ घसरली अन् भर सभेत नको ते बोलून गेले.
मुंबईत ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
मुंबईत ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ.
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल.