एक लहान ब्लॉकेज आढळला, प्रकाश आंबेडकरांची तब्येत कशी? सुजात यांचं आवाहन काय?

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एक लहान ब्लॉकेज आढळला, प्रकाश आंबेडकरांची तब्येत कशी? सुजात यांचं आवाहन काय?
प्रकाश आंबेडकर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2024 | 6:13 PM

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) रोजी त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर हॅण्डवरून माहिती देण्यात आली आहे.

बाळासाहेब आंबेडकर यांची आज अँजिओग्राफी करण्यात आली. उजव्या कोरोनरी धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला आहे, जो अँजिओप्लास्टीने सहजपणे काढला जाऊ शकतो.  त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. बाळासाहेबांच्या अँजिओग्राफीचा अहवाल उद्या सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांसमोर येणार आहे. त्यांच्यावर उद्या पुण्यात अँजिओप्लास्टी होणार आहे.

दरम्यान सुजात आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. मीडियाच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की, इकडे खूप मोठी डॉक्टरांची टीम आहे, सपोर्टीग स्टाफ आहे, जो बाळासाहेबांची काळजी घेत आहे. त्यामुळे हॉस्पिटल आणि स्टाफ यांना त्रास होईल अशी कोणतीही कृती करू नका. माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की, आपापले मतदारसंघ सांभाळा, ते सोडू नका. आम्ही सर्व बाळासाहेबांच्या सोबत आहोत असं आवाहन  वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.