AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून घाणेरडी कमेंट… त्या डॉक्टर महिलेची खैर नाही, केईएम रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय

Pranit More Show Controversy : कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉ. सेजल पवार हिने मृतदेहांवरील आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या अश्लील वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. केईएम रुग्णालयाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत त्वरित चौकशी समिती नेमली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. वैद्यकीय नैतिकतेचा भंग केल्याबद्दल रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे.

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टवरून घाणेरडी कमेंट... त्या डॉक्टर महिलेची खैर नाही, केईएम रुग्णालयाने घेतला मोठा निर्णय
प्रणित मोरेच्या शो मध्ये कमेंट करणं डॉक्टरला पडलं महागात
| Updated on: Jun 12, 2026 | 1:08 PM
Share

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये झालेल्या ‘370 रुपयांची बिर्याणी’ च्या मुद्यावरून झालेला वाद अजून थंडही झालेला नसतानाच, त्याच शोमध्ये आलेल्या एका महिला डॉक्टरने केलेल्या घाणेरड्या कॉमेंटमुळे हाँ शो पुन्हा वादात सापडला आहे. केईएम रुग्णालयातील डॉक्टर सेजल पवार हिने प्रणित मोरेच्या शो ला हजेरी लावली होती, मात्र त्यावेळी प्रणितशी बोलताना तिने असंवदेनशीलपणाचा कळस गाठला. पुरुषाच्या मृतदेहाबद्दल बोलताना तिने प्रायव्हेट पार्टवरून जी टिप्पणी केली त्याने अनेकजण संतापले. यामुळे मोठी खळबळ माजली असून आता केईएम रुग्णालयाने याची दखल घेत यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

प्रणित मोरे याच्या स्टँड कॉमेडी शोला सेजल पवार हिने हजेरी लावली होती. ती एमबीबीएसची विद्यार्थिनी असून शेवटच्या वर्षाला आहे. या व्हिडीओमध्ये सेजल पवार हिने पुरुषांच्या मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अत्यंत घाणेरडी कमेंट करत अश्लील वनोद केला होता. तिची क्लिप समोर येताच वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आणि सोशल मीडिया युजर्सनी भरमसाठ कमेंट्स करत सेजलवर टीका केली.

केईएम रुग्णालयाचा मोठा निर्णय

मात्र तिने त्या शोमध्ये केलेली विधान, त्यानंतर झालेला वाद या सर्व प्रकाराची आता KEM रुग्णालयाने दखल घेतली आहे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक याप्रकरणाबाबात भाष्य केलं असून चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितलं आहे.  ” कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ, एक क्लिप व्हायरल होत आहे. त्या कॉमेडी शो मध्ये आमच्या एका विद्यार्थिनीने मृतदेहाबद्दल काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली. त्याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत. त्या व्हिडीओची हॉ्स्पिटल प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून याप्रकरणी दोन वरिष्ठ डॉक्टरांची कमिटी स्थापन केली आहे . यासंदर्भात आज संध्याकाळपर्यत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळी अहवाल आल्यावर आम्ही ( त्या विद्यार्थिनीवर) योग्य ती कारवाई करू”, असं पाठक यांनी सांगितलं. ‘ तिने जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे. अवयव दान करतात त्यांच्या प्रति आम्हाला आदर आहे’ असंही डॉ. पाठक यांनी नमूद केलं.

सेजलने मागितली माफी

दरम्यान सेजलचा हा व्हिडीओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात टीका, ट्रोलिंग झाले. त्यानंतर तिला चुकीची उपरती झाली असून तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी डॉ. सेजल पवार हिच्यावर टीकेचा आसूड ओढला. तिच्या असंवेदनशील टिप्पणीमुळे लोकं चांगलेच संतापले.

अवयवदान आणि मृतदेहाबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी करण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी

केईएम रुग्णालयातील डॉ. सेजल राहुल पवार यांनी अवयवदान आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दान करण्यात आलेल्या मृतदेहांबाबत सार्वजनिक व्यासपीठावर कथितरीत्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका आरोग्य समिती सदस्य श्रद्धा (भारती) श्रीधर पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडे केली आहे.

Follow Us
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
मुंबईत लोकलसेवा विस्खळीत; मुंबईकर अडकले, सध्याची परिस्थिती काय?
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता...
डोंबिवलीकरांचा दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख जमा
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी...
ठाणे स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा? स्टेशनवर प्रचंड गर्दी असतानाही आरक्षित रेल्वेचे दरवाजे बंद
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर
मुंबई लोकलचा खोळंबा कायम! 10 तासांनंतरही... दादर-सीएसएमटी स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे...
शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा! मायक्रो फायनान्स कंपन्यांनाबाबत ओमराजे निंबाळकरांचा मोठा इशारा
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिर
CSMT वर रेल्वेचा खोळंबा! प्रवाशांची प्रचंड गर्दी, लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या गाड्याही 2 तास उशिराने
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून...
राज्य सरकारने आनंदाचा शिधा योजना बंद केल्यानंतरही शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय,
आता 100 टक्के इथेनॉलवर धावणार गाड्या! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, इंधन आयातही घटणार
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमारांच्या विरोधात..
काँग्रेसचा दिल्लीत एल्गार! 1 नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठे आंदोलन
सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
एकही झाड तोडू नका! सयाजी शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी