Darekar on Nashik Crime | नाशिकमध्ये राजकारण्यांकडून गुंडांना आश्रय, दरेकरांचा कोणावर आरोप?

दरेकर म्हणाले की, बारा आमदारांप्रकरणी सुप्रीम कोर्टने आम्हाला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे. सुप्रीम कोर्टने केवळ आदेश दिले नाहीत, तर ताशेरे ओढले आहेत. सरकारची सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे.

Darekar on Nashik Crime | नाशिकमध्ये राजकारण्यांकडून गुंडांना आश्रय, दरेकरांचा कोणावर आरोप?
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 10:34 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) राजकारण्यांकडून गुंडांना आश्रय दिला जातोय. इथली गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरलेत. गुंड मोकाट सुटलेत. त्यामुळे इथे गुन्हेगारीकरण वाढत आहे, असा थेट आरोप भाजप (Bjp) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी कोणाचेही नाव न घेता केला. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा खून झाला. त्या आठवड्यात सलग तीन खुनांनी नाशिक हादरले. त्यानंतरही खून, चोरी आणि दरोड्यांचे प्रकार सुरूच आहेत. नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनातही गाजला. आता प्रवीण दरेकरांनी त्याच मुद्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. दरेकर यांनी यावेळी वाईन विक्रीच्या निर्णयावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, या सरकारचे डोके ठिकाणावर नाही. वाईनचा निर्णय घेतला. त्याची वरून मखलाशी करणे सुरू आहे. दारू निर्मात्यांसाठी हे पाप असून, दारू विक्रीचा नवा अध्याय रचला जातोय, असा आरोपही त्यांनी केला.

आदित्यच्या लाईनवर काय बोलणार?

दरेकर यांनी ‘सामना’मधील संपादकीयावरही टीका केली. ते म्हणाले, ‘सामना’ हा अर्धवेळ भाजप वर टीका करण्यातच खर्च होतो. झिंगलेल्या अवस्थेत कोण आहे ते महाराष्ट्र पाहतोय. झिंगलेल्या मनस्थितीत लिहिलं जातंय. प्रज्ञा सिंह दारू हे औषध म्हणतात. त्यांचे ऐकायचे असेल, तर सर्वच ऐका ना. दुसऱ्या राज्यांचे बोलण्यापेक्षा आपल्या राज्याच बघा. तुम्ही त्या राज्यात आंदोलन करा. तुमचा राष्ट्रीय पक्ष होऊ पाहतोय, असा चिमटाही त्यांनी काढला. शिवाय आदित्य हे उत्तर समर्पक नसले की ते उत्तर देत नाहीत. त्यांच्या लाईनवर काय बोलणार, असा सवालही त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टाची सणसणीत चपराक

दरेकर म्हणाले की, बारा आमदारांप्रकरणी सुप्रीम कोर्टने आम्हाला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सणसणीत चपराक दिली आहे. सुप्रीम कोर्टने केवळ आदेश दिले नाहीत, तर ताशेरे ओढले आहेत. सरकारची सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या मनात पोटसूळ उठत आहे. मोठा पक्ष म्हटला, तर जास्तच संपत्ती राहणार ना, असा सवालही त्यांनी केला. शिवाय प्रज्ञा ठाकूर यांचे ऐकणाऱ्यांनी त्यांचा हिंदुत्ववादी विचार जपला पाहिजे. सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस लालूनचलन केलं जातंय. टिपू सुलतान यांनी हिंदूंची मंदिर नष्ट केली. महिलांवर अत्याचार केले. याचं प्रेम पुतणा मावशीचे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांना समर्थन

दरेकर म्हणाले की, एस.टी. कर्मचारी माझ्याकडे आले होते. त्यांनी मधला मार्ग काढावा, असे आवाहन केले. आम्ही आंदोलनातून बाहेर झालो, तरी त्यांना नेहमीच समर्थन राहील. सरकारने सातवा वेतन लागू करावा, असे आवाहन त्यांनी केले. सीताराम कुंटे यांच्यावर ते म्हणाले की, अंतर्गत काय खुलासे झाले ते आपण पाहिले नाही, पण बदल्यांचा बाजार मांडला होता त्याला पुष्टी देणारा खुलासा झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.

इतर बातम्याः

Nivruttinath | 800 वर्षांपूर्वी संजीवन समाधी, यशापासून निवृत्ती, ज्ञानेश्वर माऊलींचे गुरू; संत निवृत्तीनाथांची यात्रोत्सवानिमित्त अनोखी ओळख!

Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?

Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?

Non Stop LIVE Update
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय
राज्यातील सर्वंच आमदारांना अनुभव येणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य काय.
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?
नकाबचा जवाब द्यावाच लागेल, फडणवीसांच्या पत्रावरून मनसेचं काय म्हणणंय?.
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार
मी बकरा नाही तर...नीलम गोऱ्हे यांच्या 'त्या' टीकेवर राऊतांचा पलटवार.
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.