AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणावर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हटले, सणासुदीत..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मुंबईत 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत उपोषण उपोषण नको, असे नेत्यांचे म्हणणे आहे. जरांगेंच्या आंदोलनावर प्रवीण दरेकर यांनी मोठे विधान केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणावर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हटले, सणासुदीत..
Manoj Jarange Patil
| Updated on: Sep 13, 2026 | 2:22 PM
Share

अमित शाह हे मुंबई दाैऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. नुसती भेट नाही तर अर्धा तास अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे फोटोही पुढे आलीत. भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी अमित शाह यांच्या मुंबई दाैऱ्यावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील 19 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनावरही प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले. प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, अमित शाह नेहमी मुंबईत येत असतात. त्यांचं मुंबईवर प्रेम आहे. एशियाटीक लायब्ररीचं महत्व त्यांना माहिती आहे. विनय सहस्त्र बुद्धेंच्या नेतृत्वाखाली आलेल्या सोसायटीला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

जरांगे यांच्या आंदोलनावर बोलताना प्रवीण दरोकर यांनी म्हटले की, सणासुदीचे दिवस आहेत, आपल्या आंदोलनामुळे सणांवर काही नको. लोकांची गर्दी रेलचेल असते, त्यामुळे असं आंदोलन संयुक्तिक होणार नाही. पोलिसांवर विनाकारण ताण येतो, आंदोलनकर्त्यांनी त्याची जाण ठेवावी. महायुतीत असल्याने महायुतीत वितुष्ट येऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.

भाजप असो, राष्ट्रवादी किंवा शिवसेना. संजय गायकवाड आणि आमदार महालेंच्या प्रश्नावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, संजय गायकवाडांचं वागणं बोलणं महाराष्ट्राला माहिती आहे. गुन्हा दाखल करायला पार्श्वभूमी असेल पोलीस योग्य माहिती घेतात, गरज असेल तर गुन्हा दाखल करतात. राऊत यांच्यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, देशाचे गृहमंत्री वारंवार येत असतील तर आनंद मानला पाहिजे.

अमित शाहांच्या दौऱ्याने विकासात भर पडत असेल तर आनंदच आहे, आपल्या उत्सवाचा मान वाडेल. तिरकस बघायची सवय असेल तर काय करावं. खड्ड्यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरु आहे, असे नाशिकच्या प्रश्नावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले. मनोज जरांगे पाटील 15 सप्टेंबर रोजी मुंबईला निघणार आहेत. 19 तारखेपासून त्यांचे उपोषण सुरू होईल

Follow Us
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत