AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2029 पूर्वीच पंतप्रधान मोदी आणि शाह…, संजय राऊतांच्या भाकीताने मोठी खळबळ, काय केला दावा?

गुरुवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुनावणी पार पडली. त्यानंतर आज यावर बोलताना राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

2029 पूर्वीच पंतप्रधान मोदी आणि शाह..., संजय राऊतांच्या भाकीताने मोठी खळबळ, काय केला दावा?
sanjay rautImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 11:27 AM
Share

शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि एकनाथ शिंदे तसेच निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब यांचा पक्ष शाह आणि निवडणूक  आयोगाने विकला अशी बोचरी टिका यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. तसेच यावेळी बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात मोठं विधान केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना 2029 पूर्वीच जावं लागेल, राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती जगातिक स्थरावर देखील आहे, आणि देशात देखील आहे, असं यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?  

संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काश्मीरचा प्रश्न आहे, मणिपूर पेटलं आहे, रुपया घसरत आहे. देशाची पत घसरत आहे. तरुणामध्ये असंतोष आहे. यातील एका प्रश्नावर तरी पंतप्रधान मोदी यांना टेली प्रॉम्टरशिवाय बोलता येईल का? असा टोला यावेळी राऊत यांनी लगावला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना 2029 पूर्वीच जावं लागेल, राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती जगातिक स्थरावर देखील आहे, आणि देशात देखील आहे, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाकडून पक्षाचं चिन्ह आणि नाव शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता, त्यानंतर याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली, यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना देखील संजय राऊत यांनी भाजप तसेच शिंदे यांना टोला लगावला आहे.  अपात्र ठरलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्री केलं हे घटनाविरोधी आहे, निवडणूक आयोगाने पक्ष विकला आहे, असं यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा