AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गुंगी गुडिया’वरून काँग्रेसमध्ये मतभेद? पृथ्वीराज चव्हाण यांचा पक्षाला घरचा आहेर

Sunetra Pawar : काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.

'गुंगी गुडिया'वरून काँग्रेसमध्ये मतभेद? पृथ्वीराज चव्हाण यांचा पक्षाला घरचा आहेर
Prithviraj Chavan on Sunetra PawarImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 04, 2026 | 7:52 PM
Share

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गुंगी गुडिया असा केला आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले असून राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. यावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये चव्हाण यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

पृथ्वीराज चव्हाण यांची पोस्ट जशीच्या तशी…

दिल्लीत आज सकाळी अंजलीताई दमानिया यांचा फोन आला, त्यांनी महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या “गुंगी गुडिया” या पोस्टबद्दल आक्षेप नोंदवला. मी त्यांना माहिती घेतो असे सांगितले.

‌बीड मधील एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीही उत्तर न देता पत्रकार परिषद गुंडाळली‌. त्या संदर्भात काँग्रेसच्या सोशल मीडियाची ती टिपणी होती, अर्थातच महिलांच्या बाबतीमध्ये असे उद्गार टाळता आले असते, मुळातच महिलांना राजकारणात नगण्य स्थान आहे, एखादी महिला जर राजकारणात सक्रिय काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रश्न विचारायचा पत्रकारांचा अधिकार आहे आणि उत्तर न देण्याचा मंत्र्यांचा. पण त्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अनुत्तरीत राहते. त्याला मुख्यमंत्री/गृहमंत्री हे संपूर्णपणे जबाबदार आहेत, त्यांनीच उत्तर दिले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांना कधीही उत्तर न देण्याची परंपरा गेली बारा वर्षे अत्यंत काळजीपूर्वक जोपासली आहे. त्यांचे महिलांच्या बद्दलचे उदगार – ‘50 करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, किंवा गुजरातच्या महिलांच्याबद्दलचे त्यांचे वक्तव्य जगजाहीर आहेत. पण काँग्रेसची वेगळी परंपरा आहे. काँग्रेसने नेहमीच देशात राजकारणाची पातळी सांभाळायचे काम केले आहे. अशा प्रकारचा शब्दप्रयोग स्वर्गीय राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींच्या बाबत केला होता. पण इंदिराजींनी त्यांना कृतीने उत्तर दिले.

सुनेत्रा पवार या सक्रिय राजकारणात कार्यरत असून राज्याच्या एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना पातळी सोडून बोलणे योग्य नाही. अर्थातच त्यांच्याकडूनही कृतीने उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. या पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं