
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांच्या कंपनीवर पुण्यातील जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. कालच या प्रकरणात तिघांवर गुन्हे दाखल झाली. मात्र, 99 टक्के अमेडिया कंपनीचे शेअर हे पार्थ पवार यांच्या नावावर असताना त्याच्यावर गुन्हा दाखल न होता. दिग्विजय पाटील याच्या नावावर या कंपनीचा फक्त 1 टक्का शेअर आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 99 टक्के शेअर पार्थ पवार याच्या नावावर असताना देखील त्याच्यावर गुन्हा दाखल न झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटीची ही जमीन अवघ्या 300 कोटीत खरेदी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मुद्रांक शुल्क ( स्टँप ड्युटी ) म्हणून 500 रुपये भरल्याचा दावा केला जातोय.
या जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव आलेले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यामध्येच आता या संपूर्ण वादात जमिनीचा मूळ मालकाने देखील उडी घेतली असून थेट मोठी मागणीच केलीये. या वादानंतर मूळ मालकाने त्याची जमीन परत करण्याची मागणी केली आहे. हेच नाही तर आपल्या मागणीसाठी मूळ मालक आक्रमक आंदोलन करणार असल्याचीही माहिती मिळतंय.
पार्थ पवारांनी घेतलेली जमीन परत मिळवण्यासाठी मूळ मालक आक्रमक झालाय. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारूं यांच्यावर या प्रकरणात गुन्हे दाखल झाली आहेत. पार्थ पवार कंपनीचे भागीदार असतानाही त्यांच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चाैकशीचे आदेश दिले असून काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली.
पार्थ पवार यांनी खरेदी केलेली जमीन परत मिळवण्यासाठी जागेचे जे मूळ मालक आहेत, ते सर्वजण आज आंदोलन करणार असल्याचीही माहिती आहे. पुण्यातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणची ही जागा असून पार्थ पवार यांनी 300 कोटीत खरेदी केली. पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत सापडल्याचे बघायला मिळत आहे.