AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! फडणवीसांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?

सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. वरळीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर खालीद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आल आहे. या घोषणाबाजी चालू असतानाच मुख्यमंत्र्‍यांनी कार्यक्रम खराब करू नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले. दरम्यान, कार्यक्रम चालू असतानाच ही घोषणाबाजी झाल्याने काही काळासाठी सर्वत्र गोंधळ उडाला होता. पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढले.

मोठी बातमी! फडणवीसांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, नेमकं काय घडलं?
khalid ka shivaji and devendra fadnavis
| Updated on: Aug 05, 2025 | 9:51 PM
Share

सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. वरळीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर खालीद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आल आहे. या घोषणाबाजी चालू असतानाच मुख्यमंत्र्‍यांनी कार्यक्रम खराब करू नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले. दरम्यान, कार्यक्रम चालू असतानाच ही घोषणाबाजी झाल्याने काही काळासाठी सर्वत्र गोंधळ उडाला होता. पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईतील वरळी येथे महाराष्ट्र चित्रपट पुरस्काराच्या वितरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमात भाषणाला सुरूवात केली. पण त्याच वेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन व्यक्तींनी जागेवरून उभे राहत जोरदार घोषणाबाजी चालू केली. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या खालीद का शिवाजी या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून रोखावे, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी हातात पोस्टर्सही घेतले होते. हे पोस्टर्स हवेत वर करू त्यांनी खालीद का शिवाजी या चित्रपटाविरोधात घोषणा दिल्या.

कार्यक्रम खराब करू नका, फडणवीसांचे आवाहन

आंदोलकांचा हा पवित्रा पाहून फडणवीसांनी त्यांना शांत होण्याचे आवाहन केले. तसेच मी तुमच्या मागणीची नोंद घेतली आहे. त्यामुळे शांत राहा. कार्यक्रम खराब करू नका, असे फडणवीसांनी आवाहन केले. फडणवीसांच्या या आवाहनानंतर आंदोलक शांत झाले. मात्र या घटनेमळे काही काळासाठी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं.

इतिहासाचे विकृतीकरण केल्याचा आरोप

दरम्यान, पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर खालीद का शिवाजी या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. हे विकृतीकरण थांबवण्यात यावे, अशी मागणी या अज्ञात आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक