
सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. वरळीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर खालीद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आल आहे. या घोषणाबाजी चालू असतानाच मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम खराब करू नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले. दरम्यान, कार्यक्रम चालू असतानाच ही घोषणाबाजी झाल्याने काही काळासाठी सर्वत्र गोंधळ उडाला होता. पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढले.
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईतील वरळी येथे महाराष्ट्र चित्रपट पुरस्काराच्या वितरणासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमात भाषणाला सुरूवात केली. पण त्याच वेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दोन व्यक्तींनी जागेवरून उभे राहत जोरदार घोषणाबाजी चालू केली. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या खालीद का शिवाजी या चित्रपटाला प्रदर्शित होण्यापासून रोखावे, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली. आंदोलकांनी यावेळी हातात पोस्टर्सही घेतले होते. हे पोस्टर्स हवेत वर करू त्यांनी खालीद का शिवाजी या चित्रपटाविरोधात घोषणा दिल्या.
आंदोलकांचा हा पवित्रा पाहून फडणवीसांनी त्यांना शांत होण्याचे आवाहन केले. तसेच मी तुमच्या मागणीची नोंद घेतली आहे. त्यामुळे शांत राहा. कार्यक्रम खराब करू नका, असे फडणवीसांनी आवाहन केले. फडणवीसांच्या या आवाहनानंतर आंदोलक शांत झाले. मात्र या घटनेमळे काही काळासाठी चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं.
दरम्यान, पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर खालीद का शिवाजी या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. हे विकृतीकरण थांबवण्यात यावे, अशी मागणी या अज्ञात आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.