
Pune Ganesh Kale Murder Case : गेल्या काही महिन्यांत पुण्यात हत्येच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणाने तर संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली होती. या तरुण मुलाला पार्किंगमध्ये गोळ्या घालण्यात आल्या होत्या. आता गणेश काळे या रिक्षाचालकाची भर पावसात धाडधाड गोळ्या घालून रस्त्यावरच हत्या करण्यात आली आहे. आंदेकर टोळीने हे हत्याकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. गोळ्या घालून नंतर गणेश काळेवर कोयत्यानेही वार करण्यात आले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आल आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत या प्रकरणात मोठे यश मिळवले आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेश काळे यांच्या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलवून ज्या ठिकाणी हत्या झाली, त्या ठिकाणचे पुरावे जमा केले. त्यानंतर लगेच पोलिसांनी आपला तपास सुरू केला. या प्रकरणात एकूण तीन ते चा जणांनी रस्त्यावरच गणेश काळे यांना गाठत रिक्षातच गोळ्या घातल्या आहेत. गोळ्या घालून लगेच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले होते. आता याच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी गणेश काळे हत्या प्रकरणात सहा संशयित आरोपींना पकडले आहे. आज (1 नोव्हेंबर) दुपारी गणेश काळे यांचा गोळ्या घालून खून झाला. त्यानंतर पुढच्याच काही तासांत पोलिसांनी वेगाने तपास करत या प्रकरणात एकूण सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी हत्येची घटना घडली त्या परिसरातील पेट्रोल पंपावर असलेले सीसीटीव्हीदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आता आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.
दरम्यान, गणेश काळे हे समीर काळे यांचे बंधू आहेत. समीर काळे हा नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आरोपी आहे. वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी शस्त्र पुरवल्याचा समीर काळे याच्यावर आरोप आहे. आता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.