
Pune Husband Murder Case : विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीची अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत आहेत. पुणे, पिंपरी चिंचवडमधील टोळीयुद्धाची दर राज्यभरात चर्चा झाली होती. सध्या नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका चैताली नावाच्या महिलेने आपल्याच पतीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. या खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, या खून प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे हत्याकांड घडण्यापूर्वी नकुल आणि चैताली या दोघांनीही दारुची पार्टी केली होती. त्यानंतर दारुच्या नशेतच चैतालीने आपल्या पतीला संपवलं आहे.
नकुल भोईर आत्महत्या प्रकरणात आता नवी आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी पत्नी चैताली आणि नकुल भोईर या दोघांनीही मद्य सेवन केल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच ही हत्या आरोपी चैताली हिने मद्याचं सेवन करून केल्याचं उघड झालं आहे. नकुल भोईर यांची सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख होती. तर आरोपी असलेली पत्नी चैताली हिला आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा होती. तिला नगरसेवक व्हायचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार नकुल भोईर हा चैतालीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. काल (23 ऑक्टोबर) सायंकाळी देखील त्या दोघांत वाद झाला होता. रात्री देखील नकुल आणि त्याची पत्नी चैताली यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरात चैतालीने नकुलची ओढणीने गळा दाबून केली हत्या. हे भांडण झाले त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत होते. दोघांनीही सोबत दारू पिली होती. नकुल आणि पत्नी चैताली हे अनेकदा दोघे सोबतच दारुची पार्टी करायचे. काल ही दोघांनी पार्टीचा बेत आखला. या पार्टीदरम्यान नकुलने प्रमाणापेक्षा जास्त दारू पिली. त्यामुळे पूर्ण नशेत असल्याने त्याला चैतालीचा प्रतिकार करता आला नाही. पुढे चैतालाही दारुच्या नशेत असल्याने थांबली नाही. यातच नकुलचा खून झाला.
दरम्यान, आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. लवकरच या प्रकरणी आरोपपत्र दाख होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. त्यापूर्वी या प्रकरणात भविष्यात आणखी काही गंभीर माहिती समोर येते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.