Pimpri Crime : दिवाळीच्या संध्याकाळी चारित्र्यावरून वाद, नगरसेविका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीने ओढणी घेऊन..
पती-पत्नीच्या नात्यात संशय शिरल्यास काय होतं, याची भीषण परिणती पिंपरी-चिंचवडमध्ये दिसली. दिवाळीच्या दिवशीच पत्नीने पती नकुल भोईरची हत्या केली. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद होत असे. याच वादानंतर पत्नीने ओढणीने गळा आवळून पतीचा जीव घेतला. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

पती-पत्नीचं नातं हे जन्मजन्मांतरीचं असतं अस म्हणतात. लग्नात सप्तपदी घेताना पती-पत्नी हे एकमेकांची साथ देण्याचं, सात जन्म एकत्र राहण्याच वचन देतात. या नात्यात प्रेम, आदर आणि सगळ्यात महत्वाचा असतो तो एकमेकांवरचा विश्वास.. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास असेल तर कितीही वादळं आली तरी संसाराचा पाय डगमगत नाही. मात्र जर याच नात्यात संशयाचं भूत शिरलं तर मग अख्खा संसार उद्ध्वस्त होतो. एकमेकांवर संशय नसल्याने किती तरी जोडप्यांच्या संसाराची राखरांगोळी होते, कोणी वेगळं होतं तर कोणी अजून काही करतं .
पण याच संशयातून कोणी कोणाचा जीव घेतला तर ? एका शुल्लक वादावरून पत्नीने तिच्याच, जोडीदाराची, पतीची दिवाळीच्या दिवशीच हत्या केल्याची धक्कादायक घटना ही पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. चारित्र्यावर वारंवार संशय घेतल्याने पती-पत्नीत सारखा वाद व्हायचा. कालच दिवाळीचा शेवटचा दिवस होता, तरी त्यांच्यात आधी संध्याकाळी आणि मग रात्री पुन्हा वाद झाला. आणि त्याच वादानंतर रागाच्या भरात पत्नीने तिचीच ओढणाी वापरत पतीचा यगळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे ह्त्या केल्याचा अत्यंत संतापजनक आणि तितकाच क्रूर गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, नकुल भोईर असे मृत इसमाचे नाव आहे. तो सामजिक कार्यकर्ता होता, तर आरोपी पत्नी ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होती. नकुल आणि आरोपी महिलेचा काही काळापूर्वी विवाह झाला होता. मात्र नकुल भोईर हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर खूप संशय घ्यायचा, त्यामुळे त्यांच्यात सारखे खटके उडायचे, वादही व्हायचा.
काल दिवाळीच्या दिवशी देखील याच संशयावरून नकुल व त्याच्या पत्नीचे संध्याकाळी भांडण झालं. तो वाद मिटतो ना मिटोत तोच पुन्हा त्याच कारणावरून रात्रीही ते एकमेकांशी पुन्हा भांडेल. आणि त्याच वादात पत्नीने तिचीच ओढणी वापरत पती नकुलचा गळा दाबला आणि त्याची निर्घृणपणे हत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ माजली.
गुन्ह्याची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच आरोपी पत्नीला बेड्या ठोकून ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
