AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Case : सीसीटीव्ही फुटेजने बदलली तपासाची दिशा, लोहगडावर केतन, सिया, चेतनमध्ये नेमकं काय आणि कसं घडलं? सर्वकाही अखेर समोर

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणातील समोर येणाऱ्या गोष्टी अत्यंत हृदयद्रावक आहेत.. आता सीसीटीव्ही फुटेजने बदलली तपासाची पूर्ण दिशा बदलेली आहे. त्यादिवशी केतन, सिया, चेतनमध्ये नेमकं काय आणि कसं घडलं? सर्वकाही समोर आलं आहे.

Ketan Agarwal Case : सीसीटीव्ही फुटेजने बदलली तपासाची दिशा, लोहगडावर केतन, सिया, चेतनमध्ये नेमकं काय आणि कसं घडलं? सर्वकाही अखेर समोर
Ketan Agarwal Case
| Updated on: Jun 25, 2026 | 10:33 AM
Share

Pune Ketan Agrawal Murder Case : पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यामुळे काहीच चूक नसलेल्या केतन याने स्वतःची जीव गमावला आहे… अशात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सियाला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं तर, तिने स्पष्ट नकार द्यायला हवा होता? सियानेने केतन याच्यासोबत झालेला साखरपुडा मोडला का नाही? किंवा चेतन याच्यासोबत अफेअर होतं तर, त्याच्यासोबत पळून का गेली नाही? सांगायचं झालं तर, पोलीस चौकशीत सर्व काही समोर आलं आहे… चेतन याच्या पळून लग्न केलं असतं, तर कुटुंबियांची बदनामी झाली असती आणि यात भीतीमुळे इच्छा नसताना सिया हिने केतन याच्यासोबत साखरपुडा केला आणि आनंदी राहण्याचं फक्त नाटक करत होता.

पोलिसांना चेतन याने काय सांगितलं?

पोलस चौकशीत चेतन चौधरी याला विचारण्यात आलं की, सिया हिला पळवून का नेलं नाही? केतन याला मारण्याचा निर्णय का घेतला ? चेतन याने सांगितल्यानुसार, साखरपुडा मोडून चेतन याच्यासोबत पळण्यास सिया तयार नव्हती… कुटुंबियांचा समाजात अपमान होईल.. असं सिया हिचं म्हणणं होतं. अखेर केतन याला मार्गातून हटवण्यासाठी दोघांनी टोकाचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा – पोलिसांसमोर सिया गोयलने उघडले सर्व राज, का केली केतनची हत्या? कारण ऐकून पोलिसही थक्क…

लोहगडावर नेमकं काय आणि कसं घडलं…

सिया हिच्यासोबत साखरपुडा झाल्यानंतर केतन याचं निधन लोहगड येथून पडून झालं. सुरुवातीला त्याच्या मृत्यूकडे किंगदरम्यान झालेली दुर्घटना म्हणून पाहिले गेलं होतं. ट्रेकिंग करताना पाय घसरल्यामुळे तो पडला, असं सियाने त्याच्या कुटुंबीयांना सांगितलं. पण सत्य परिस्थिती वेगळी होती. पोलिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तपासाची दिशा बदलली.. या फुटेजमध्ये एक मुखवटा घातलेली व्यक्ती केतन आणि सियाचा पाठलाग करताना दिसली, ज्यामुळे तपासकर्त्यांच्या मनात संशय निर्माण झाला.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, त्या व्यक्तीने शॉर्ट्स आणि हुडी घातली होती. हुडीचा पुढचा भाग इतका खाली होता की, त्या व्यक्तीचा चेहरा देखील दिसत नव्हता. शिवाय त्याने हुडीवर हेडसेट लावलं होतं… अन्य एका फुटेजमध्ये पोलिसांना असं आढळून आलं की, सिया अचानम मागे वळून पाहते तेव्हा हुडी घातलेली व्यक्ती खाली बसते…

अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, 18 जून रोजी पोलिसांनी तापमान तपासलं असता ते सुमारे 33 अंश सेल्सिअस असल्याचं आढळलं; त्यामुळे, त्या व्यक्तीने हुडी का घातलेली, असा प्रश्न उपस्थित झाला. पोलिसांनी नंतर त्या व्यक्तीची ओळख चेतन चौधरी अशी पटवली, त्याने आणि सियाने मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याचं उघड केलं. या दोघांनाही 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

केतन याचा अपघात नाही तर, पूर्वनियोजित हत्या

19 जून रोजी सियाने लोहगडावर आणखी एका सहलीचे नियोजन केलं. यादरम्यान, चेतन चौधरी याला देखील मागून बोलावण्यात आलं आणि केतन अग्रवालला किल्ल्यावरून 400 फूट खोल असलेल्या दरीत ढकलून देण्यात आलं, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना अपघात नसून पूर्वनियोजित हत्या होती, असा निष्कर्ष तपासातून निघाल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

Follow Us
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप