Pune Metro -3 चे नवे तंत्रज्ञान, ओएचई शिवाय धावणार सुसाट, शिवाजीनगर ते हिंजवडी हे दीड तासांचे अंतर अवघ्या इतक्या मिनिटांत
पुणेकरांची लवकरच वाहतूकीच्या कोंडीतून सुटका होणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर अशा आयटी हबला जोडणाऱ्या पुणे मेट्रो - ३ संदर्भात आनंदाची बातमी समोर आली आहे.

पुणेकरांची लवकरच वाहतूकीच्या कोंडीतून सुटका होणार आहे. पुण्याच्या शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो - ३ चा १३.३ किमीचा मान ते आर.के. लक्ष्मण म्युझियम हा १२ स्थानकांचा पहिला टप्पा लवकरच सुरु होत आहे.

हा कॉरिडॉर आता डिस्ट्रीक्ट कोर्टपर्यंत वाढवला जात असल्या महा मेट्रो नेटवर्कशी जोडला जाणार आहे. पुणे मेट्रो लाईन-३ सुरु झाल्यानंतर सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी या प्रवासाला लागणारा दीड तासांचा वेळ आता ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

पुणे मेट्रो लाईन - ३ देशातील मोजक्या शहरात असलेल्या डीसी ७५० व्होल्ट थर्ड रेल इलेक्ट्रीफिकेश सिस्टीमवर चालणार आहे. यात हिंजवडी ते शिवाजीनगर कॉरिडॉरवर पहिल्यांदा शहरात असे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ज्यात ओएचईचा वापर न होता रुळांमधूनच करंट मिळणार आहे. कोलकाता मेट्रो, बंगळुरु नम्मा मेट्रोनंतर हे तंत्रज्ञान पुण्यात वापरण्यात आले आहे.

पारंपारिक इलेक्ट्रीफिकेशन सिस्टीममध्ये ओव्हरहेड वायर आणि मास्टवर अवलंबून राहावे लागते. या नव्या तंत्रात रुळांमध्ये पॉवर सप्लाय दिलेला असतो. त्यामुळे ओव्हरहेड वायरचा खर्च आणि देखभालीचा खर्च वाचतो. तसेच पॉवर फेल होण्याचा धोका टळतो.

या नव्या तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना ट्रेनची जास्त वेळ पाहावी लागत नाही. ओव्हरहेड वायर तंत्रज्ञानाच्या तुलनेत ट्रेनच्या फेऱ्या वाढतात. पुणे मेट्रो लाईन -३ मुळे हिंजवाडा येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क, वाकड, बाणेर, बालेवाडी, युनिव्हर्सिटी सर्कल आणि शिवाजीनगर सारखे महत्वाचे भाग जोडले जाणार आ

थर्ड रेल सिस्टीम सिस्टीम कम्युनिकेश बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) एडव्हान्स डिजिटल सिग्नलिंग टेक्नॉलॉजी या दोन्हींमुळे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना लवकरच