AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईस्क्रीम देण्याचा बहाणा केला, ती ओरडताच…; पुण्यात 14 वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका गावात आईस्क्रीम विक्रेत्याने १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पौड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईस्क्रीम देण्याचा बहाणा केला, ती ओरडताच...; पुण्यात 14 वर्षांच्या चिमुकलीसोबत घडलं भयंकर
फोटो प्रातिनिधिक
| Updated on: May 06, 2026 | 2:24 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून गावोगावी फिरून आईस्क्रीम विकणाऱ्या एका नराधमाने १४ वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सतर्क ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. याप्रकरणी पौड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. आरोपी पिंटू शिवकुमार हा मूळ उत्तर प्रदेशातील रहिवाशी आहे. तो पुण्यातील मुळशी तालुक्यातील सूस या गावात राहतो. काही दिवसांपूर्वी पिंटू हा दुचाकीवरून आईस्क्रीम विकण्यासाठी पीडितेच्या गावातील घराजवळ आला होता. यावेळी पीडित १४ वर्षीय गतिमंद मुलगी तिच्या लहान चुलत बहिणीसह आईस्क्रीम घेण्यासाठी त्याच्याकडे गेली होती.

आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला जवळ ओढले. त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. यामुळे घाबरलेल्या पीडितेने आरडाओरडा केला. त्यानंतर तात्काळ तिथून पळ काढत घर गाठले. तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

पोलिसांकडून आरोपीला अटक

पीडितेने आरडाओरडा केल्याचे लक्षात येताच आरोपी पिंटू शिवकुमार याने तिथून दुचाकीसह पळ काढला होता. मात्र, पीडितेच्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी तातडीने परिसरात त्याचा शोध सुरू केला. काही वेळातच आरोपीला शोधून काढण्यात आले. यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला पकडून पौड पोलिसांच्या स्वाधीन केले. पौड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी पिंटू शिवकुमार याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सध्या पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं