पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

पौड रोडवरील अतिक्रमण कारवाई करत असताना त्याला आडकाठी आणून पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आलाय.

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 9:16 AM, 26 Feb 2021
पुणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी
पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम

पुणे : पौड रोडवरील अतिक्रमण कारवाई करत असताना त्याला आडकाठी आणून पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune municipal Carporation Assistant Commissioner Sandeep Kadam Threatened Death Case File)

जावेद शेख, हसीना शेख आणि चार महिलांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रकाश धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोथरुड पोलीस तपास करत आहेत.

पौड रोडवरील भीमनगर झोपडपट्टी ते मयुर कॉलनी दरम्यान रस्त्याचेमध्ये येणारे अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु होती. यावेळी आरोपींनी आमचं घरं रस्ता रुंदीकरणामध्ये येत नाही, तुम्ही आम्हाला नोटीसही दिली नाही आणि मोबदलाही दिला नाही. तुम्ही आमच्या घराला हातच कसा लावतो, असं म्हणत आयुक्तांना धमकी तसंच शिवीगाळ चालू केली.

यावेळी घटनास्थळी एस.आर.ए. चे अतिरिक्त आयुक्त होते. त्यांच्यासमोर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तुम्ही मला कधी संध्याकाळचे एकटे भेटा, मग दाखवतो तुम्हाला आमचा इंगा, अशी थेट धमकी कदम यांना दिली. बेकायदेशीर जमाव जमवून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांत गुन्हा दाखल केला गेला आहे.

(Pune municipal Carporation Assistant Commissioner Sandeep Kadam Threatened Death Case File)

हे ही वाचा :

Bharat Bandh: भारत बंदचा कोणावर परिणाम, कोणत्या सेवा बंद राहणार, वाचा सविस्तर

छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे गृहमंत्री कुठे आहेत, पूजा चव्हाण प्रकरणावर ते का बोलत नाही, फडणवीस भडकले