60 ते 70 तरुण-तरुणी झिंगाट, पुणे पोलिसांची रेव्ह पार्टीवर धाड, थेट बंगल्यातच..
Pune Crime News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेव्ह पार्टीचे आयोजन केले जात आहे. त्यामध्येच आता एका रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला. 60 ते 70 मुले मुली झिंगाट झाली होती. या पार्टीत अंमली पदार्थाचे सेवन झाल्याच अंदाज पोलिसांचा आहे.

पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या पार्टीत 60 ते 70 तरुण तरुणी सहभागी होते. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी ज्यावेळी या रेव्ह पार्टीवर छापेमारी केली, त्यावेळी सर्व तरुण तरुणी नशेत होते. अंमली पदार्थांचे सेवन या तरुण तरुणींनी केल्याचा अंदाज पोलिसांचा आहे. मोठ्या प्रमाणात तिथे दारूही विक्री सुरू होती. या पार्टीत इतक्या मोठ्या संख्येने अंमली पदार्थ नक्की कुठून आले, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. कोणचीही परवानगी न घेता या रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या आवाजात म्युझिक आणि सर्व धिंगाणा यादरम्यान सुरू होता. एका बंगल्यावर या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीतील तरुण तरुणींना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांची चाैकशी सुरू आहे.
नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ पोलिसांनी जप्त केले. 100 टक्के या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर झाल्याच पोलिसांचा अंदाज आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याची हद्दत ही रेव्ह पार्टी सुरू होती. गुप्त माहिती मिळाली की, 60 ते 70 तरुण तरुणी पार्टीत सहभागी असून अंमली पदार्थांचे पार्टीत सेवन केले जात आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
जवळपास 100 पोलिस पार्टीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी संपूर्ण बंगल्याला घेरले आणि मग कारवाईला सुरूवात केली. ज्यावेळी ही कारवाई केली जात होती, त्यावेळी या रेव्ह पार्टीमध्ये सहभागी असलेल्या मुला मुलींना काहीच कळत नव्हते. जवळपास सर्वच जण नशेत होते. पूर्णपणे त्यांचा धिंगाणा सुरू होता.
पोलिसांनी या रेव्ह पार्टीचे आयोजन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची कसून चाैकशी सुरू आहे. कोणतीही परवानगी नसताना इतक्या मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. प्रोजेक्ट एक्स असे या पार्टीचे नाव होते. सर्वकाही व्यवस्था तिथे करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात दारूचा साठा देखील मिळाला आहे.