AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ एका प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडलं?; अडचणी वाढणार?

गेल्या सहा महिन्यांपासून सांगतोय राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकार करतंय काय. सरकार असंवेदनशील आहे. इंदापुरात केळीचं प्रचंड नुकसान झालीय. कांदा सडतोय. सरकारने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप केलं आहे. नुकसान झालं, तिथे यंत्रणा जाईल असं सांगितलं गेलं, पण तिथे कोणी गेलं नाही असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

'त्या' एका प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडलं?; अडचणी वाढणार?
supriya sule and devendra fadnavisImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 23, 2024 | 9:45 PM
Share

पुण्यातील कल्याणी नगर येथे बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाने आपल्या आलिशान पोर्शे कारने दोघा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण-तरुणीला उडवून ठार केल्याचे प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आले आहे. मध्य प्रदेशातून शिक्षण आणि नोकरीसाठी आलेले हे आयटी इंजिनिअर्स या अपघातात बळी गेल्यानंतर अवघ्या 15 तासांत बिल्डर पूत्र अल्पवयीन तरुणाला लागलीच जामीन मिळाला. त्याला बाल हक्क न्यायालयाने लागलीच वाहतूकीचे नियम लिहीण्याचा निबंध लिहीण्याची शिक्षा दिल्याने हे प्रकरण प्रचंड वादग्रस्त ठरले आहे. या प्रकरणात पुण्याच्या येरवडा पोलिसांनी आरोपीचा गंभीर गुन्हा पाहाता त्याला सज्ञान गृहीत धरुन कलमे लावायला पाहीजे होती अशी मागणी होत आहे. त्यानंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आरोपीला सज्ञान समजावे असा अर्ज कोर्टाला केल्याचे सांगितले. यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच कोंडीत पकडले आहे.

पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरणावरुन राज्यात आणि देशात राजकारण तापले आहे. हे प्रकरण राष्ट्रीय वाहीन्यांनी उचलून धरले आहे. या प्रकरणात आता सरकार बॅकफूटवर आले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे अर्ध्या रात्री पोलिस ठाण्यात गेले त्यांनी तेथे हस्तक्षेप केल्याचा आरोप कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यातच आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर या प्रकरणात त्यांनी का तोंड उघडले नाही असा आरोप केला आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे.

फोन कोणी केला?

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका. याचा अर्थ राजकीय दबाव कोण टाकू शकतो? जो सत्तेत आहे तोच दबाव टाकू शकतो. म्हणजे राजकीय दबाव कोणी टाकला. देवेंद्र फडणवीस यांना मुंबईवरून पुण्याला का यावं लागलं ? याचं स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे. फोन कोणी केला? वकील कोणी पाठवला?. लवकर बेल कशी मिळाली ? याचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिले पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ही क्रुर चेष्टा आहे. दोन लोकांची हत्या झाली. आणि हे निबंध आणि पिझ्झा देत आहेत.. इतकं असंवेदनशील सरकार मी कधीच पाहिलं नाही. गलिच्छ आहे हे सर्व असेही सुळे यांनी म्हटले आहे.

17 वर्षाच्या मुलाला दारू दिली कशी ?

आमदार टिंगरे यांचा पवारांच्या काळात पक्षात प्रवेश झाला होता ? असा आरोप भाजपा नेते नितेश राणे यांनी केला होता. यावर विचारले असता त्यांनी कोणते पवार.?  नितेश राणेंनी आरोप केला आहे, तर त्यांनाच विचारा कोणते पवार ? सरकारचा असंवेदनशीलपणा आणि हलगर्जीपणा आहे. 17 वर्षाच्या मुलाला दारू दिली कशी ? हे चेक करीत नाही. आयडी कार्ड वापरतो ना. आम्ही पार्लमेंटमध्ये आयकार्ड घालून जातो. एअरपोर्टवर जाऊन कार्ड दाखतो. आयडेंटीटी का तपासली नाही. पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. कुणी फोन केला ज्यामुळे बेल मिळाली याचं उत्तर मिळालं पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

सरकार गंभीर नाही

हे खोक्याचं सरकार आहे. त्यांच्यात भांडण सुरू झाली आहेत. निवडणुकीत समन्वय नसल्याचं दिसून आलं आहे. पाचवी फेज झालीय. डेटा येतोय. महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स अत्यंत चांगला आहे. सरकार सीरिअस नाही, ड्रग्सज, क्राईम, रोड सेफ्टी असो की दुष्काळ… सरकार गंभीर नाही. चारा छावण्या प्रायव्हेट लोकांनी केल्या आहेत. सरकार काही करीत नाही असा आरोप सुळे यांनी केला आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.