Raj Thackeray: ओवेसी, उद्धव ठाकरे, भोंगे, अयोध्या ते बृजभूषण सिंह; राज ठाकरेंच्या खणखणीत भाषणातील 10 टॉप मुद्दे

Raj Thackeray: ओवेसी, उद्धव ठाकरे, भोंगे, अयोध्या ते बृजभूषण सिंह; राज ठाकरेंच्या खणखणीत भाषणातील 10 टॉप मुद्दे
ओवेसी, उद्धव ठाकरे, भोंगे, अयोध्या ते बृजभूषण सिंह; राज ठाकरेंच्या खणखणीत भाषणातील 10 टॉप मुद्दे
Image Credit source: tv9 marathi

Raj Thackeray: मी हट्टाने अयोध्येला गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक, हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर.

भीमराव गवळी

|

May 22, 2022 | 12:54 PM

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांची आज पुण्यात जोरदार सभा पार पडली. या भाषणातून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), अकबरुद्दीन ओवैसी, बृजभूषण सिंह, अयोध्या दौरा (ayodhya) आणि भोंग्यावरून घणाघाती हल्ला केला. तसेच राणा दाम्पत्यांच्या आंदोलनावरूनही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मात्र, भाजप खासदारावर टीका करतानाच भाजपवर टीका करण्याचं राज ठाकरे यांनी टाळलं. तसेच पुढचा अयोध्या दौरा कधी होणार यावरही भाष्य केलं नाही. शिवाय पुण्यातील मनसेतील अंतर्गत वादावरही त्यांनी भाष्य केलं नाही. आपल्या सभांना काही हॉल परवडत नाही. पण मी कार्यकर्त्यांना सांगितलं एसपी कॉलेज मिळतं का बघा. महाविद्यालयाने हॉल देण्यास नकार दिला. हल्ली आम्ही कुणाला हॉल देत नाही, असं त्यांनी सांगितलं. ठिक आहे. आम्हाला नाही तर कुणालाच नाही. मग नदीपात्राचा विषय झाला. पण हवामान पाहता कोणत्याही वेळेला पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. काल मुंबईत पाऊस पडला. म्हटलं निवडणुका नाहीत. काही नाही. उगाच कशाला भिजत भाषण करा. निवडणुकांना वेळ आहे, असा टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.

राज ठाकरे यांच्या सभेची अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

हिपबोनची 1 जूनला शस्त्रक्रिया

पुण्यात आलो. पुण्यात आल्यावर पायाचं दुखणं सुरू आहे. पायामुळे कमरेला त्रास होतो. दोन दिवस काही नव्हतं म्हणून मुंबईला गेलो. फिजीओबीजीओ करत होतो. प्रकरण वाढल्याने. 1 तारखेला शस्त्रक्रिया करणार आहे. माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे का सांगितलं तर कुणाला न सांगता शस्त्रक्रिया करायला गेलो तर पत्रकार कोणताही अवयव बाहेर काढतील. मलाही पत्रकारांचं वाईट वाटतं. ते स्कूटरवरून फिरत होते. त्या दिवशी पुस्तक घ्यायला गेलो तेही होते. मीही वैतागत होतो. ते चॅनेलवरून काहीही दाखवत असतात. आता निघाले… डावा पाय दिसला… बोट दिसलं… कुणाला इंटरेस्ट आहे? एक एक अवयव दाखवत बसलाय. असो ते त्यांचं काम करत असतात.

अयोध्येच्या निमित्ताने ट्रॅप

अयोध्या दौरा रद्द केला. काही लोकांना वाईट वाटलं. काहींना आनंद झाला. काही लोक कुत्सित बोलत होते. त्यामुळे दोन दिवसांचा मुद्दाम बफर दिला. काय बोलयाचं ते बोला. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र आणि देशाला सांगेल. ज्या दिवशी लाऊडस्पीकर बंदची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात मी अयोध्येला जाणार असल्याची तारीख जाहीर केली. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. अयोध्येला येऊ देणार नाही. मी पाहत होतो. काय चाललं नेमकं. मला मुंबईतून माहिती मिळत होती. दिल्लीतून माहिती मिळत होती. उत्तर प्रदेशातून माहिती मिळत होती. नेमकं काय चाललंय. हा सगळा ट्रॅप आहे. या सापळ्यात आपण आडकून पडू नये.

म्हणून अयोध्येला जायचं नव्हतं

या सर्व गोष्टीची सुरुवात झाली. त्याची रसद पुरवली गेली. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाली. हा विषय पुन्हा बाहेर काढा. ज्यांना ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सर्वांनी मिळून आराखडा आखला. मी एकाच गोष्टीचा विचार केला. अयोध्येला जाणार हा विचार मनात होता. राम जन्मभूमीचं दर्शन घेणं आलं. पण मला वाटतं तुम्ही जन्मालाही आला नसतील. तेव्हा चॅनेल्स नव्हती. तेव्हा दूरदर्शन होतं. त्यावेळचे पत्रकार होते. त्यावेळी अर्धा तासाचे न्यूज रिल्स चालवायचे. मला आठवतं. तेव्हा मुलायम सिंह मुख्यमंत्री होते. तेव्हा कारसेवक अयोध्येला गेले होते. त्यांना ठार मारलं होते. त्यांची प्रेतं शरयू नदीत तरंगताना पाहिली होती. दर्शन घ्यायचं होतंच. कारसेवक जिथे मारले गेले. ती जागा अयोध्येत आहे. त्याचं दर्शन घ्यायचं होतं. राजकारणात अनेकांना भावना समजून घेत नाहीत. असो.

खासदार मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो हे शक्य आहे का?

मी हट्टाने अयोध्येला गेलो असतो. महाराष्ट्रातील सैनिक, हिंदू बांधव आले असते. तिथे जर काही झालं असतं. आपली पोरं तर गेली असती अंगावर. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. तुम्हाला तुरुंगात सडवलं गेलं असतं. हकनाक कारण नसताना केसेसचा ससेमिरा लावला असता. मी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंना सांगितलं आपल्या पोरांना हकनाक घालवणार नाही. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांवर केसेस टाकल्या असत्या. ऐन निवडणुकीच्यावेळी हे झालं असंत. तेव्हा इथे कोणीच नसतं हा सर्व ट्रॅप होता. एक खासदार उठतो आणि मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य आहे का. या गोष्टींना अनेक पापुद्रे आहेत. काही तर तुम्हाला सांगता येणार नाही.

आपल्या विरोधात सर्व एकत्र

मी शिव्या खाईल. माझ्यावरील टीका सहन करेल. पण पोरं नाही अडकवू देणार. राज ठाकरेंनी माफी मागावी असं म्हणत होते. आता जाग आली. 12 वर्षानंतर जाग आली. तेव्हा कुठे होती ही माणसं. एक सांगतो. यातून चुकीचे पायंडे पडतात हे लक्षात ठेवा. विषय माफी मागण्याचा आहे ना. गुजरातला अल्पेश ठाकूर नावाचा व्यक्ती आहे. एका मुलीवर बलात्कार झाला. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांना चोप दिला. 10 ते 15 हजार लोकांना गुजरातमधून हाकलून दिलं. ते मुंबईत आले. ते पुन्हा गुजरातला गेले. तिथून कोण माफी मागणार आहे? तिथून कुणाला माफी मागायला लावणार? तुम्हीहही राजकारण समजून घ्या. हे आता कसं काय सुरू झालं अचानक. ज्यांना हिंदूत्व झोंबलं, लाऊडस्पीकर झोंबले. आपल्या विरोधात सर्व एकत्र येतात. नाहीतर भांडत असतात.

हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच

साधी गोष्ट आहे. राणा दाम्पत्य. मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा लावा, मी सांगितलं. राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मातोश्री काय मशिद आहे का? राणा दाम्पत्यांना आत टाकलं. मधू इथे अन् चंद्र तिथे. त्यानंतर एकत्रं आले. सोडण्यात आलं. सेनेकडून वाट्टेल ते बोलण्यात आलं. तेही बोलले. एवढा राडा पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्य आणि संजय राऊत जेवताना दिसले. शिवसेनेतील पदाधिकारी लोकांना काहीच वाटत नाही. जे लोक मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आले. तिकडे त्यांच्यसोबत जेवताय, फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच आहे.

उत्तर भारतीयांविरोधातील आंदोलन कुठून सुरू झालं?

त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय सालं पोरकटपणा आहे कळत नाही. तुमचं खरं हिंदूत्व की आमचं खरं हिंदुत्व. काय वाशिंग पावडर आहे? तुम्हारी कमीजसे हमारी कमीज व्हाईट कैसी. लोकांना हिंदुत्वाचा रिझल्ट पाहिजे. जे आम्ही देतो. महाराष्ट्रातील मराठी माणसाला आम्ही रिझल्ट देतो. हे जे उत्तर प्रदेशचे बोलत आहेत. जेव्हा आंदोलन झालं होतं. 12 वर्ष झाली. रेल्वे भरती महाराष्ट्रात होती. तिकडून हजारो लोकं रेल्वे स्टेशनवर आली. मी फोटो पाहिला. काय प्रकरण आहे याची माहिती घ्यायला पदाधिकाऱ्यांना सांगितलं. जाऊन बोला असं मी बोलायला गेले होते. कुठून आले? काय आला? बोलता बोलता त्या बाचाबाचीत आपल्या पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. त्यानंतर जे प्रकरण सुरू झालं. ते तिथून. प्रकरण सोडा.

एक आंदोलन अर्धवट सोडल्याचं दाखवा

हे जे टिमक्या मिरवतात ना, राज ठाकरे अर्धवट सोडवतो. अर्धवट आंदोलन सोडल्याचं एक तरी उदाहरण दाखवा. टोलनाक्याचं आंदोलन घेतलं. 70 टोलनाके बंद झाले. म्हणजे यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षाची जबाबदारी नाही. टोलवाले लुटतात. त्याचं काहीच नाही. बॉलिवूडमध्ये पाक कलाकार येत होते. त्यांना देशातून हाकलून दिलं. कुठे होते त्यावेळी हिंदुत्वाची पकपक करणारे? रझा अकादमीने पोलीस महिलांवर हात टाकला. त्याविरोधात मनसेने मोर्चा काढला. कोणतं हिंदुत्व बोलता तुम्ही? उद्धव ठाकरेंनी सांगावं तुमच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का हो? मग ती मराठीच्या प्रश्नावर असेल किंवा हिंदुत्वाच्या प्रश्नावर असेल. एक तरी केस आहे का? भूमिकाच कुठची घ्यायची नाही. 92-93 ला दंगल झाली, त्यावरच बोलायचं. परवा म्हणाले. संभाजीनगरचं नामांतर झालं काय नाही झालं काय मी बोलतोय ना. अरे तू कोण आहेस. तू कोण वल्लभ भाई पटेल काय महात्मा गांधी? मी बोलतोय ना. त्याला काय लॉजिक आहे. इतके वर्ष केंद्रात सत्ता होती. कधी प्रश्न मिटवला का? केवळ निवडणुकीसाठी हा विषय जिवंत ठेवायचं आणि मते मिळवायची. याच गोष्टी यांना करायच्या आहेत. उद्या नामांतर झालं तर बोलायचं कशावर. प्रश्नच मिटला.

सोयीसाठी कशाला इतिहास बदलता?

मोदींना विनंती आहे की समान नागरी कायदा आणावा असं मी म्हटलं होतं. लोकसंख्या नियंत्रणासाठी नवीन कायदा आणावा. आणि औरंगाबादचं संभाजीनगर हे नामांतर लवकरच लवकर करा. यांचं एकदा राजकारण मोडितच काढा. यांच्या राजकारणासाठी हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. एमआयएम सतत हिंदूच्या विरोधात बोलेल. यांची रोजीरोटी सुरू राहील यावर भर दिला. पण एक राक्षस वाढवतो हे याच्या लक्षात आलं नाही. म्हणता म्हणता त्यांचा खासदार झाला. या निजामाच्या औलादी इकडे वळवळ करायला लागल्या. या भुसभूशीत जमीन दिली कुणी? यांनीच. यांच्याच राजकारणासाठी दिली. शिवसेनेचा खासदार पडला. एमआयएमचा निवडून आला. आमच्याच देशात आमच्याच महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज नाही, शरम नाही. सत्ताधारीच बसले आहेत. पवारांना औरंगजेपब सुफी संतच वाटत असेल तर काय बोलायचं? सुफी संत? अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता म्हणे. मग काय मध्ये शिवाजी महाराज आले. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता?

हे सुद्धा वाचा

शिवसेनेला अक्कल नाही

हे प्रत्येकवेळेला तुम्हाला गृहित धरणार. वाटेल ते राजकारण करणार. कोणी कोणाला भेटतंय. शिवसेनेतील कोण म्हणालं की आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. यावर कहर. पवार साहेब सांगताय आम्ही सकाळी भांडायचो आणि रात्री शिवसेनाप्रमुखांसोबत जेवायचो. तुम्ही बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला एवढीही अक्कल नाहीये, तुम्ही कुणाबरोबर राहताय. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. पण हे सत्तेत इतके मश्गूल आहे. त्यांना कशाची पर्वा नाही. कारण जनता बेपर्वा आहे. लोक विसरतात आणि भलत्या गोष्टीवर मतदान होतात. आम्ही काहीही केलं तरी निवडून येतो. हे त्यांना वाटतं. हे बदलल्याशिवाय काहीच होणार नाही

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें