दारुसाठी पुणेकरांची ई गर्दी, तब्बल 10 हजार 877 पुणेकरांची ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी

उत्पादन शुल्क विभागाच्या ई टोकन पद्धतीला पुणेकरांचा (Pune e-token liquor) जोरदार प्रतिसाद मिळत आहे.पहिल्याच दिवशी पुणेकरांनी हायटेक फंडा वापरत ई टोकन घेतलं.

दारुसाठी पुणेकरांची ई गर्दी, तब्बल 10 हजार 877 पुणेकरांची ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी
Follow us
| Updated on: May 13, 2020 | 2:26 PM

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ई टोकन पद्धतीला पुणेकरांचा (Pune e-token liquor) जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी पुणेकरांनी हायटेक फंडा वापरत ई टोकन घेतलं. तब्बल 10 हजार 877 पुणेकरांनी ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी केली आहे. वाईन शॉप समोरील गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई टोकन पद्धत सुरु केली आहे‌. (Pune e-token liquor)

ही ई – टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करून ई – टोकन घेणे आवश्यक आहे.

सुरुवातीला ग्राहकानं आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्य विक्री दुकानांची यादी मिळेल. यानंतर एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल.

आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई – टोकन मिळणार आहे. त्यानंतर या टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी संबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.

परवानाधारकांना घरपोच दारुची सुविधा

दुसरीकडे राज्य सरकारने परवानाधारक ग्राहकांना घरपोच दारु मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  राज्य सरकारने आता ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना घरपोच दारु मिळणार आहे. मात्र, ही परवानगी फक्त दारु विक्रीचा परवाना असलेल्या दुकानदारांनाच आणि ज्याच्याकडे दारु खरेदीचा परवाना आहे अशा ग्राहकासच देण्यात आली आहे. म्हणजे जो विक्री करतो तो दुकानदार आणि जो खरेदी करतो तो ग्राहक या दोघांकडे परवाना हवा.  राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे.

वाचा : दारु खरेदीतही ‘लेडीज फर्स्ट’, भिवंडीत वाईन शॉपबाहेर तळीरामांकडून बायकोला रांगेत उभं करण्याचे प्रकार

दरम्यान, लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशात दारुची दुकानं बंद करण्यात आली होती. जवळपास 40 दिवसांनंतर 4 मे रोजी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील अनेक भागात दारुची दुकानं सुरु करण्यात आली. दुकानं सुरु करताच दुकानाबाहेर मद्यप्रेमींनी मोठ्या रांगा लावल्या. यावेळी मद्यप्रेमींनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडले. त्यामुळे दारुची दुकानं उघडल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र आता ऑनलाईन पद्धत वापरुन दारुविक्री सुरु करण्याची निर्णय सरकारने घेतला आहे.

(Pune e-token liquor)

संबंधित बातम्या 

दारु खरेदीसाठी आता ई-टोकन सुविधा, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अनोखी उपाययोजना

Online Liquor | ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी, घरपोच दारु मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.