AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katewadi Lockdown : पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन

शरद पवार कुटुंबीयांचं गाव असलेल्या काटेवाडीत 14 दिवसांकरिता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुढील 14 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Katewadi Lockdown : पवारांच्या काटेवाडीत 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 24, 2021 | 5:44 PM
Share

बारामती, पुणे : शरद पवार कुटुंबीयांचं गाव असलेल्या काटेवाडीत 14 दिवसांकरिता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुढील 14 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं काटेवाडी गावामध्ये शंभर टक्के लॉकडाऊन पाळला जात आहे. दोन दिवसापूर्वी गावांमध्ये अँटीजन कॅम्प घेतला होता, या कॅम्पमध्ये 27 रुग्ण आढळून आले. त्यामुळं गावात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (14 days Lockdown in Sharad Pawars village Katewadi from Baramati, Pune)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. आधी शहरांमध्ये थैमान घातलेल्या कोरोनाने आता गावखेड्यात धडक दिलीय. त्यामुळे तालुका आणि गाव पातळीवरील प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.  बारामती तालुक्यात मागील दोन महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाय. रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानं गेल्या महिन्यात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता जून महिन्यातही रुग्णसंख्येचा वेग कायम असल्याने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काल 23 जून रोजी 10 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले. तर काल दिवसभरात 163 रुग्णांचा मृत्यू झाला

देशातील रुग्णसंख्या 

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 54 हजार 69 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 321 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे.

संबंधित बातम्या  

कोरोनाची गावखेड्यात धडक! बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, कोरोनाबळींत किंचीत घट

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.