AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : तुषार हंबीरवरच्या हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक, बंडगार्डन पोलिसांची कारवाई; टोळीयुद्धातून झाला होता हल्ला

सोमवारी रात्री हंबीर दाखल असलेल्या बेडपर्यंत पोहोचण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला. त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने रोखले, त्यात त्याला जखमही झाली होती. 25 ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून हंबीरला ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Pune crime : तुषार हंबीरवरच्या हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक, बंडगार्डन पोलिसांची कारवाई; टोळीयुद्धातून झाला होता हल्ला
संग्रहित छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: Sep 08, 2022 | 10:11 AM
Share

पुणे : ससून सामान्य रुग्णालयाच्या (Sassoon General Hospital) नवीन वॉर्डमध्ये तुषार हंबीर (35) या अटकेतील गुन्हेगारावर हल्ला केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police) मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली. या चौघांकडून पोलिसांनी एक तलवार, चॉपर, देशी बनावटीचे पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेले जिवंत काडतूस जप्त केले आहे. पोलीस उपायुक्त (झोन II) सागर पाटील म्हणाले, की गुप्त माहितीच्या आधारे आम्ही सागर हनुमंत ओव्हाळ (22), त्याचा भाऊ, बालाजी (23), सूरज शेख (19) आणि सागर आटोळे (21) यांना अटक केली. हे सर्व हडपसर येथील आहेत. सिंहगड रोडवरील (Sinhagad road) पानमळा येथील घरात ते लपून बसले होते. हे सर्व जण हंबीरच्या प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्य आहेत. या दोन्ही टोळीतील सदस्य यापूर्वी अनेकदा एकमेकांविरुद्ध आले आहेत.

टोळीयुद्धातून हल्ला

या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाचव्या व्यक्तीचा शोध पोलीस सुरू ठेवत असून, या हल्ल्यामागे जुने वैर असल्याचे पूर्व वैमनस्य असल्याचे समोर आले आहे. ओव्हाळ बंधू हडपसरमधील एका टोळीचे सदस्य आहेत. सुजित वर्मा हा त्यांचा म्होरक्या होता, ज्याची 2017मध्ये हंबीर टोळीच्या सदस्यांनी हत्या केली होती. तेव्हापासून त्यांच्यातील शत्रुत्व वाढत गेले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हत्येप्रकरणी तुरुंगात

सोमवारी रात्री हंबीर दाखल असलेल्या बेडपर्यंत पोहोचण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला. त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने रोखले, त्यात त्याला जखमही झाली होती. 25 ऑगस्ट रोजी येरवडा मध्यवर्ती कारागृहातून हंबीरला ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. सप्टेंबर 2015मध्ये राजकीय पक्षाचा युवा-विभागाचा नेता हेमंत गायकवाड यांच्या हत्येतील कथित सहभागानंतर हंबीरला 2016 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून तो तुरुंगात आहे.

विविध गुन्हे दाखल

बंड गार्डन पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले, की सागर ओव्हाळ याच्यावर मालमत्ता आणि देहविक्रय यासह पाच गुन्हे दाखल आहेत. त्याचा भाऊ बालाजी याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. इतर दोघांवरही मालमत्ता आणि देहविक्रीचे गुन्हे दाखल आहेत.

हल्लेखोरांना हंबीरची माहिती कशी मिळाली?

पाच हल्लेखोरांना हंबीर ससून रुग्णालयात आल्याची माहिती कशी मिळाली, याबाबत डीसीपी पाटील म्हणाले, ओव्हाळ बंधू आणि त्यांचे साथीदार हंबीरच्या टोळीतील आणखी एका सदस्याच्या मागे होते. तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की टोळीचा सदस्य ससून रुग्णालयात वारंवार येत होता. त्याचा पाठलाग करत असताना त्यांना समजले की हंबीरला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपींची कसून चौकशी

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की ओव्हाळचे वडीलदेखील मूत्रपिंडाच्या आजारामुळे ससून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना समजले की हंबीरची माणसे वारंवार याठिकाणी येत आहेत. अशा प्रकारे त्यांना हंबीर रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, आरोपींची कसून चौकशी केली जात असून आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.