AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर बांधकामासाठी साहित्य घेऊन येत होता शेतकरी; अचानक घडली ही दुर्दैवी घटना

घराच्या बांधकामाचं साहित्य खरेदी करण्यासाठी गेला. तिथं टेम्पोत साहित्य भरलं. सोबत चुलतभाऊ होता. घराच्या बांधकामाचं साहित्य घेऊन ते घराजवळ आले.

घर बांधकामासाठी साहित्य घेऊन येत होता शेतकरी; अचानक घडली ही दुर्दैवी घटना
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 01, 2023 | 7:31 AM
Share

पुणे : स्वतःच हक्काचं घर असावं असं साऱ्यांनाच वाटतं. काहींना ते पारंपरिक मिळते. तर काही जणांना स्वतःच्या कष्टातून ते उभं करावं लागतं. शिरकोली येथील एका शेतकऱ्यानं स्वतःच्या नव्या घराचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी पै-पै जमा केला. पुण्याला घराच्या बांधकामाचं साहित्य खरेदी करण्यासाठी गेला. तिथं टेम्पोत साहित्य भरलं. सोबत चुलतभाऊ होता. घराच्या बांधकामाचं साहित्य घेऊन ते घराजवळ आले. तेवढ्यात दुर्घटना घडली नि होत्याचं नव्हतं झालं.

घराजवळ घडली दुर्घटना

वेल्हा तालुक्यातील पानशेत भागातील शिरकोली येथे घराचे बांधकाम साहित्य घेऊन जाणारा पिक अप टेम्पो पलटला. या अपघातात एका शेतकऱ्याचा दुर्देवी अंत झाला आहे. आपल्या नव्या घराचे स्वप्न उराशी बाळगून कोंडीबा आबाजी ढेबे (वय ४५, रा.शिरकोली) यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

PUNE N 2 सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. शिरकोली येथील घराजवळ जाण्यासाठी कच्चा दगडांचा रस्ता आहे. या रस्त्यावरून पिकअप जात असताना पलटी होवून हा अपघात झाला.

टेम्पोखाली चिरडून मृत्यू

कोंडिबा ढेबे आणि त्यांचा भाऊ तुकाराम ढेबे हे घराचे बांधकाम करण्यासाठी पुण्यातून बांधकाम साहित्य घेऊन पिकअप टेम्पोमधून‌ चालले होते. कच्च्या दगड गोट्यांच्या रस्त्यावरून चढावर टेम्पो अचानक पलटी झाला. त्यावेळी टेम्पोमध्ये बसलेले ढेबे हे टेम्पो खाली चिरडून जागीच मृत्यूमुखी पडले.

अशी माहिती शिरकोलीचे माजी उपसरपंच मारूती मरगळे, विराज पासलकर, पांडुरंग ढेबे यांनी दिली. कोंडिबा ढेबे यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. कोंडिबा ढेबे यांच्या अपघाती निधनाने शिरकोली पानशेत परिसरावर शोककळा पसरली आहे.

रस्त्याने केला घात

कोंडिबा ढेबे हे शेतकरी होते. त्यांनी मेहनतीने पैसे कमवले होते. आता घराचे बांधकाम करणार. चांगल्या नवीन घरात राहणार, अशी स्वप्न त्यांनी पाहिले होते. पण, हे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही. रस्ते खराब असल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जातं.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा