AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adar Poonawalla : आधी भारत नंतर आशिया खंडात लसीचं वितरण करणार; जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य : पुनावाला

सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या या भेटीविषयी माहिती दिली. यावेळी पुनावाला यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखील उत्तर दिलं.

Adar Poonawalla : आधी भारत नंतर आशिया खंडात लसीचं वितरण करणार; जुलै 2021 पर्यंत 30 कोटी लसींचं लक्ष्य : पुनावाला
| Updated on: Nov 28, 2020 | 7:39 PM
Share

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत कोरोना लस निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला. मोदींनी जवळपास 1 तास सीरममधील संशोधकांशी चर्चा केली. यानंतर आता सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या या भेटीविषयी माहिती दिली. यावेळी पुनावाला यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना देखील उत्तर दिलं (Adar Poonawalla Press Conference on PM Narendra Modi visit to Serum Institute in Pune).

आदर पुनावाला म्हणाले, “जगभरातील एकूण लसींपैकी 50-60 टक्के लसी भारतात बनवल्या जातात. याशिवाय आता आत्मनिर्भर भारत मोहिमेचा विचार करता आपण साथीरोगाशी लढण्यासाठी पुण्यातील मांजरी येथे सर्वात मोठी व्यवस्था उभी केली आहे. या व्यवस्थेचीही पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यात आली.यावर त्यांच्याशी सखोल चर्चा झाली.”

“आम्ही पंतप्रधान मोदींसोबत लस वितरणाबाबत चर्चा केली. मात्र, हे वितरण आपत्कालीन वितरणाची मंजूरी मिळाल्यानंतरच शक्य होणार आहे. यासाठी आम्ही योग्य आकडेवारी आणि माहिती संबंधित विभागाकडे जमा करत आहोत. त्यांनी याची तपासणी केल्यानंतरच ही मंजूरी मिळेल. अंतिम निर्णय आरोग्य मंत्रालयासोबत चर्चेनंतरच होईल,” असंही पुनावाला यांनी सांगितलं.

“विविध कोरोना लस तयार होत आहेत. पंतप्रधान मोदींनी आजच्या भेटीत सीरमच्या लसीची माहिती घेतली. सध्या भारत सरकार किती लस खरेदी करणार हे मात्र अद्याप निश्चित झालेलं नाही. आम्ही पुढील 2 आठवड्यात आपत्कालीन परवान्यासाठी देखील अर्ज करणार आहोत. आम्ही सर्वात आधी भारतात कोरोना लस वितरण करु, नंतर जगभरातील कोव्हॅक्स देशांमध्ये वितरण होईल.”

आदर पुनावाला यांनी यावेळी भारतात कोरोना लस साठवण्यासाठीच्या सुविधांवरही भाष्य केलं. ते म्हणाले ,”भारतात 1 किंवा 2 डिग्री सेल्सीयस तापमानावर साठवण्याची मोठी क्षमता आहे. मात्र, उणे 20 डिग्री सेल्सीअस तापमानासाठी मात्र आपल्याकडे कमी सुविधा आहेत.”

“ही एक उत्तम लस असून ही लस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. तसेच ही लस रुग्णाच्या शरीरात प्रवेश करणाऱ्या 60 टक्के विषाणूंना रोखते,” असंही ते म्हणाले.

आदर पुनावाला यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • पंतप्रधान मोदींना लसीसंबंधिची खूप माहिती
  • मोदी विविध लसींबद्दल भरभरून बोलले
  • लसीकरणाच्या वितरणाचा प्लॅन तयार
  • युरोपियन देशही अॅस्ट्रा झेनेकोवर लक्ष ठेऊन
  • कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी 2 आठवड्यात परवान्यासाठी अर्ज करणार
  • लसीची तिसरी चाचणी अंतिम टप्प्यात

संबंधित बातम्या :

PM Modi in Pune | पुनावाला कुटुंबाकडून पंतप्रधान मोदींचं हातजोडून स्वागत; मोदींचा पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात

मिशन कोरोना व्हॅक्सीन! अहमदाबाद, हैदराबादनंतर पंतप्रधान मोदी सिरममध्ये; संशोधकांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा, अनेक आजारांवरील लस निर्मितीमध्ये ‘सीरम’चं मोठं योगदान

Adar Poonawalla Press Conference on PM Narendra Modi visit to Serum Institute in Pune

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.