Pune Election | अजित पवार, आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकीसाठी युती होणार ?

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसांत ते पुणे येथे येऊन आढावा घेतील. मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी शिवसेनेनं स्वबळाची तयारी सुरु केली आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेणार आहेत. तशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे.

Pune Election | अजित पवार, आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर; महापालिका निवडणुकीसाठी युती होणार ?
ajit pawar and aditya thackeray
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 2:32 PM

पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक (Pune Municipal Corporation Election) तोंडावर आल्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. पुणे महापालिकेवरील सत्ता महत्त्वाची असल्यामुळे सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेनेदेखील ही निवडणूक गांभीर्याने घेतली असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. या दोन दिवसांत ते पुणे येथे येऊन आढावा घेतील. मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी शिवसेनेनं स्वबळाची तयारी सुरु केली आहे. मात्र युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेणार आहेत. तशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारही पुणे दौरा करुन निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीदेखील स्वबळाची तयारी केलेली आहे.

युतीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार

आदित्य ठाकरे सहा आणि सात फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर असतील. या दोन दिवसांमध्ये ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच ते पुणे शहरातील राजकारणाचा आढावा घेणार आहेत. या निवडणुकीत शिवसेना कोणासोबत युती करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र युतीचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. तशी माहिती शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिली आहे.

अजित पवारही पुणे दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा 

तर दुसरीकडे पुणे महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूक आखाड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दंड थोपटले आहेत. ते शुक्रवार किंवा शनिवारी पुण्यात पक्षाची बैठक घेण्याची शक्यता आहे. बैठकीत अजित पवार स्वबळाचा नारा देणार की पुण्यात युती होणार ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सध्यातरी शहर नेतृत्वाने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. अजित पवार पुण्यात आल्यानंतर पक्षाची बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

इतर बातम्या :

अनेक स्तरातून वाईन विक्रीला विरोध, वेगळा निर्णय घेतल्यास वाईट वाटू नये, शरद पवार यांच्या वक्तव्यामुळं मोठ्या निर्णयाचे संकेत

Nashik Corona | कोरोनाने 6 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्याही वाढली, जाणून घ्या आजचा अहवाल!

Sourav Ganguly in controversy: सौरव गांगुलीवरुन BCCI मध्ये दोन गट? पुन्हा एकदा झाला मोठा आरोप